१ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ मार्च चे दिनविशेष.

दिनांक १ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
![]() |
१ मार्च दिनविशेष, वसंतराव दादा पाटील / माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (छायाचित्र सौजन्य: अखिल भारतीय काँग्रेस) |
वसंतराव दादा पाटील - (१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी.
शेवटचा बदल १ मार्च २०२३
जागतिक दिवस
१ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्वांतत्र्य आंदोलन दिन: दक्षिण कोरिया.
- जागतिक संरक्षण दिन.
ठळक घटना (घडामोडी)
१ मार्च रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १५६२: फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,०००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.
- १५६५: ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
- १६४०: ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरु केले.
- १८६९: रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी 'जगदहितेच्छु' नावाचे पत्र सुरु केले शिवरामपंत परांजपे यांचे 'काळ' पत्र सुरुवातीला जगदहितेच्छूच्या छापखान्यात छापले जायचे
- १८७२: यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
- १८७३: ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
- १८९६: आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
- १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
- १९१२: आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
- १९२७: रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.
- १९३६: हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
- १९४७: आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजास सुरुवात झाली.
- १९४८: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९६९: नवी दिल्ली व कलकत्त्यामध्ये धावणारी पहिली सुपरफास्ट रेल्वेगाडी 'राजधानी एक्सप्रेस' सुरु झाली.
- १९७८: स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
- १९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
- १९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- १९९९: भूसुरुंगावर बंदी घालणारा करार १३३ देशांच्या संमतीने कार्यरत
- २००१: भारताच्या लोकसंख्येने १०० कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर दुसरा देश ठरला
- २०१९: पाकिस्तानी वायुदलाच्या भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांना पिटाळून लावताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ३ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९१४: भानुदास श्रीधर परांजपे, कथाकार, समीक्षक.
- १९१७: करतार सिंह दुग्गल, पंजाबी, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये लिहिणारे प्रसिद्ध साहित्यकारक
- १९२२: डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव.
- १९३०: कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३०: राम प्रसाद गोएंका, उद्योगपती.
- १९४४: बुद्धदेव भट्टाचार्य, पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री.
- १९५१: नितीश कुमार, प्रसिद्ध राजनीतिज्ञ तसेच पूर्व रेल्वे मंत्री व बिहारचे २२वे मुख्यमंत्री.
- १९५३: बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५: अभिनेत्री अर्चना जोगळेकर.
- १९६८: कुंजराणी देवी, भारतीय महिला वेटलिफ्टर.
- १९६८: सलील अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८०: शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८३: मेरी कोम, भारतीय महिला मुष्टियोद्धी.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९५५: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती, महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक.
- १९८८: सोहन लाल द्विवेदी, हिंदीचे प्रसिद्ध कवी.
- १९८९: वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ.
- १९९१: एडविन लँड, अमेरिकन संशोधक.
- १९९४: मनमोहन देसाई, हिंदी फिल्म निर्माता व निर्देशक
- १९९९: पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर, वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती.
- २००३: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- २०१४: प्रफुल्ला डहाणूकर, चित्रकार
- २०१७: तारक मेहता, लेखक.
१ मार्च दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
मार्च महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे मार्च महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय