१३ नोव्हेंबर दिनविशेष

१३ नोव्हेंबर दिनविशेष - [13 November in History] दिनांक १३ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१३ नोव्हेंबर दिनविशेष | 13 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ नोव्हेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
१३ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • TEXT: TEXT.

ठळक घटना / घडामोडी
१३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
 • १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
 • १९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
 • १९२१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
 • १९३१: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
 • १९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
 • १९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
 • १९९५: सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
 • २०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१३ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७८०: महाराजा रणजितसिंग (शिख साम्राज्याचे संस्थापक, मृत्यू: २७ जून १८३९).
 • १८५०: आर. एल. स्टीव्हनसन (इंग्लिश लेखक व कवी,2 मृत्यू: ३ डिसेंबर १८९४).
 • १८५५: गोविंद बल्लाळ देवल (आद्य मराठी नाटककार, मृत्यू: १४ जून १९१६).
 • १८७३: बॅ. मुकुंद रामराव जयक (कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, मृत्यू: १० मार्च १९५९).
 • १८९८: इस्कंदर मिर्झा (पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती, मृत्यू: १३ नोव्हेंबर १९६९).
 • १९१७: वसंतदादा पाटील (महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, मृत्यू: १ मार्च १९८९).
 • १९१७: गजानन माधव मुक्तिबोध (हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक, मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४).
 • १९५४: स्कॉट मॅकनीली (सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक).
 • १९६७: जूही चावला (भारतीय हिंदी अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१३ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७४०: कृष्णदयार्णव (प्राचीन मराठी कवी, जन्म: १६७५ (अक्षय्य तृतीया)).
 • १९५६: इंदुभूषण बॅनर्जी (शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार, जन्म: १ नोव्हेंबर १८९३).
 • २००१: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी (ज्येष्ठ लेखिका, जन्म: १५ ऑगस्ट १९१७).
 • २००२: ऋषिकेश शाह (नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते, जन्म: १६ मे १९२५).

१३ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.