१ नोव्हेंबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ नोव्हेंबर चे दिनविशेष.

दिनांक १ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
![]() |
शरद तळवलकर (छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह) |
शरद तळवलकर - (१ नोव्हेंबर १९१८ - २१ ऑगस्ट २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते.
शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०२२
जागतिक दिवस
१ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- मृतक दिन: मेक्सिको
- राष्ट्र दिन: अल्जीरिया
- स्वातंत्र्य दिन: अँटिगा आणि बार्बुडा
- राज्य स्थापना दिन: केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
- जागतिक वनस्पतीभक्षक दिन
ठळक घटना (घडामोडी)
१ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १६८३: फोंडा येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.
- १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले. (व्हिडिओ संदर्भ)
- १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
- १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
- १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
- १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.
- १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
- १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
- १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९५६: मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती करण्यात आली.
- १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.
- १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.
- १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
- १९५६: केरळ राज्य स्थापना दिन.
- १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
- १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.
- १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.
- १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.
- १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.
- १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.
- १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.
- १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७६२: स्पेंसर पर्सिव्हाल (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, मृत्यू: ११ मे १८१२)
- १७७८: गुस्ताव्ह चौथे ॲडॉल्फ (स्वीडनचे राजे, मृत्यू: ७ फेब्रुवारी १८३७)
- १८६५: माँटी बाउडेन (इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १९ फेब्रुवारी १८९२)
- १९१८: शरद तळवलकर (मराठी चित्रपट अभिनेते, मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)
- १९२३: ब्रुस डूलँड (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ८ सप्टेंबर १९८०)
- १९२६: जेराल्ड स्मिथसन (ईंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ६ सप्टेंबर १९७०)
- १९४०: रमेश चंद्र लाहोटी (भारताचे सर्वोच्च न्यायाधीश, मृत्यू: २३ मार्च २०२२)
- १९५१: क्रेग सर्जियन्ट (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: )
- १९६४: कोसला कुरुप्पुअराच्छी (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: )
- १९६८: अक्रम खान (बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: )
- १९७०: शर्विन कॅम्पबेल (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: )
- १९७३: ऐश्वर्या राय (भारतीय अभिनेत्री, मृत्यू: )
- १९७४: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: )
- १९८७: इलिआना डिक्रुझ (भारतीय अभिनेत्री, मृत्यू: )
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १३९१: आमाद्युस सातवा (सव्हॉयचा राजा, जन्म: )
- १७००: कार्लोस दुसरा (स्पेनचा राजा, जन्म: )
- १८९४: अलेक्झांडर तिसरा (रशियाचा झार, जन्म: )
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / नोव्हेंबर दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय