अंजीर व गुलाब (इसापनीती कथा)

अंजीर व गुलाब, इसापनीती कथा - [Anjir Va Gulab, Isapniti Katha] निसर्गाने जे आपणास दिले त्यातच संतुष्ट रहावे हे योग्य आहे.
अंजीर व गुलाब - इसापनीती कथा | Anjir Va Gulab - Isapniti Katha
अंजीर व गुलाब (इसापनीती कथा), चित्र: वैशाली चिटगोपकर.
अंजीर व गुलाब (इसापनीती कथा) - निसर्गाने जे आपणास दिले त्यातच संतुष्ट रहावे हे योग्य आहे.

एके दिवशी एका बागेत अंजिराचे झाड व गुलाबाचे झाड हे परस्परांच्या गुणदोषांबद्दल चर्चा करत होते.

गुलाबाचे झाड म्हणाले: ‘अऽऽऽ हाऽऽऽ! माझ्यासारखी अशी सुंदर-सुंदर फुले तुलाही येण्याची युक्ती तुला कोणी सांगितली तर तू त्याला वाटेल ते देऊ करशील नाही का?’

अंजीराचे झाड म्हणाले: ‘...आणि माझ्यासारखी गोड-गोड; रसाळ अशी फळे तुला आली तर तू तर आपला जीवसुद्धा बहाल करशील.’

गुलाबाचे झाड म्हणाले: ‘छे छे, मला फळे आलेली पाहून लोक हसतील ना!’

अंजीराचे झाड म्हणाले: ‘आणि मला फुले आली तर मलासुद्धा लोक हसतील ना; शिवाय फुलांची फळांसोबत तुलना होऊ शकत नाही कारण आपल्या दोघांचेही गुणधर्म आणि उपयोग हे भिन्न आहेत; हे कुणीही सांगेल.’

तात्पर्य: निसर्गाने आपणास जे आणि जसे दिले आहे त्यात संतुष्ट रहावे हे योग्य असते.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.