३१ ऑक्टोबर दिनविशेष

३१ ऑक्टोबर दिनविशेष - [31 October in History] दिनांक ३१ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३१ ऑक्टोबर दिनविशेष | 31 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३१ ऑक्टोबर चे दिनविशेष


अमृता प्रीतम - (३१ ऑगस्ट १९१९ - ३१ ऑक्टोबर २००५) पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री असून भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.

शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
३१ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • हॅलोवीन: ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथ.
 • मृतकांचा दिवस: फिलिपाईन्स.

ठळक घटना / घडामोडी
३१ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८६३: ग्रेट ब्रिटनने न्यू झीलँडच्या वैकाटोवर हल्ला केला.
 • १८६४: नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले.
 • १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
 • १८८०: बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग.
 • १९१३: लिंकन हायवे या अमेरिकेच्या दोन्ही तीरांना जोडणारा मोटरकार जाऊ शकणारा अशा पहिला रस्त्याचे उद्घाटन.
 • १९१७: पहिले महायुद्ध- बीरशेबाची लढाई.
 • १९२०: भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना.
 • १९४१: माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण.
 • १९४१: दुसरे महायुद्ध- यु.एस.एस. रुबेन जेम्स या अमेरिकन विनाशिकेला जर्मन पाणबुडीने बुडविले. १०० खलाशी ठार.
 • १९४१: हडर्सफील्ड, इंग्लंड येथील कपड्यांच्या कारखान्यात आग लागून ४९ ठार.
 • १९६३: इंडियानापोलिसमधील आइस रिंकमध्ये स्फोट होउन ७४ ठार, ४०० जखमी.
 • १९८४: भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या.
 • १९९४: अमेरिकन ईगल एरलाइन्सचे ए.टी.आर. ७२ प्रकारचे विमान रोझलॉन, इंडियाना येथे कोसळले. ६८ ठार.
 • १९९६: टॅम त्रांसपोर्तेस एरोस रिजनैस फ्लाइट ४०२ हे फोक्कर एफ. १०० प्रकारचे विमान साओ पाउलो येथे घरांवर कोसळले. जमीनीवरील दोघांसह ९८ ठार.
 • १९९९: इजिप्तएर फ्लाइट ९९० हे विमान नान्टकेट, मॅसेच्युसेट्स जवळ समुद्रात कोसळले. २१७ ठार.
 • १९९९: कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला.
 • २०००: सिंगापूर एरलाइन्स फ्लाइट ००६ हे बोईंग ७४७-४०० प्रकारचे विमान ताइपेइ विमानतळावरुन उड्डाण करताना धावपट्टीवरील बांधकाम साहित्याला धडकले. ८३ ठार.
 • २०००: उत्तर अँगोलातून उड्डाण केल्याकेल्या स्फोट होउन अँतोनोव्ह ए.एन. २६ प्रकारचे विमान कोसळले. ५० ठार.
 • २०००: सोयुझ टी.एम.-३१ प्रकारच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहण्यासाठीचा पहिला गट रवाना. या दिवसापासून स्थानकात कायम मानववस्ती आहे.
 • २०१५: कोगालिमाव्हिया फ्लाइट ९२६८ हे एरबस ए३२१ प्रकारचे विमान उत्तर साइनाई द्वीपकल्पावर कोसळले. २२४ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
३१ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३४५: फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १३९१: दुआर्ते, पोर्तुगालचा राजा.
 • १४२४: व्लादिस्लॉस, पोलंडचा राजा.
 • १७०५: पोप क्लेमेंट चौदावा.
 • १८३५: एडॉल्फ फोन बेयर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
 • १८७५: सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान.
 • १८८७: च्यांग कै-शेक, चिनी नेता.
 • १८८७: विल्यम व्हायसॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९५: सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९२२: नोरोदोम सिहोनुक, कम्बोडियाचा राजा.
 • १९२६: एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक.
 • १९३१: डॅन रादर, अमेरिकन पत्रकार.
 • १९४६: रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: पीटर जॅक्सन, न्यू झीलँडचा चित्रपट दिग्दर्शक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३१ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.