अरण्य आणि लाकूडतोडया - इसापनीती कथा

अरण्य आणि लाकूडतोडया, इसापनीती कथा - [Aranya Aani Lakudtodya, Isapniti Katha] शत्रूची कीव करून जो त्यास साहित्य पुरवितो, तो बहुधा शेवटी पश्चात्ताप पावतो.
अरण्य आणि लाकूडतोडया
एक लाकूडतोडया एके दिवशी रानात गेला असता इकडेतिकडे पाहत रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्यास विचारले, ‘तू का रडतोस? तुला काय पाहिजे?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुऱ्हाडीस दांडा नाही, याकरिता लाकडाचा एक लहानसा तुकडा मला दयाल तर बरे होईल.’

हे ऐकून झाडांस त्याची दया आली व त्यांनी त्यास चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोडयाने तो आपल्या कुऱ्हाडीस घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा चालविला. तेव्हा सागवानाचा वृक्ष इतर वृक्षांस म्हणतो, ‘गडे हो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. येथे दुसऱ्यास नाव ठेवण्यास जागा नाही.’

तात्पर्य: शत्रूची कीव करून जो त्यास साहित्य पुरवितो, तो बहुधा शेवटी पश्चात्ताप पावतो. शत्रूवर उपकार करावा, त्याचे अन्याय क्षमा करावे, यात थोरपणा आहे ही गोष्ट खरी, पण जेणेकरून आपला शत्रू बलवान होऊन आपणास उपद्रव करील, अशा प्रकारचे सहाय्य त्यास देणे, हा मूर्खपणा होय.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.