अस्वल आणि मधमाश्या - इसापनीती कथा

अस्वल आणि मधमाश्या, इसापनीती कथा - [Aswal Aani Madhmashya, Isapniti Katha] प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला असता त्याच्या भरात तो स्वतःसही इजा करून घेण्यास कमी करीत नाही.
अस्वल आणि मधमाश्या - इसापनीती कथा | Aswal Aani Madhmashya - Isapniti Katha
एका बागेत मधमाश्यांचे पोळे होते, त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्यास तोंड लाविले आणि आता मध पिणार इतक्यात सगळ्या मधमाश्या त्याच्यावर तुटून पडल्या आणि त्याच्या नाकातोंडास चावून त्यांनी त्यास अगदी सतावून सोडले.

त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की, रागाच्या सपाटयात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजांनी फाडून टाकली!

तात्पर्य: प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला असता त्याच्या भरात तो स्वतःसही इजा करून घेण्यास कमी करीत नाही.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.