३० ऑक्टोबर दिनविशेष

३० ऑक्टोबर दिनविशेष - [30 October in History] दिनांक ३० ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३० ऑक्टोबर दिनविशेष | 30 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT

शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
३० ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
३० ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ७५८: अरबी आणि इराणी चाच्यांनी चीनचे ग्वांगझू शहर लुटले.
 • १४७०: हेन्री सहावा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १४८५: हेन्री सातवा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १५०२: वास्को दा गामा दुसर्‍यांदा कालिकतला पोचला.
 • १९१८: झार निकोलस दुसर्‍याने रशियाच्या पहिल्या संविधानाला मंजूरी दिली.
 • १९१८: पहिले महायुद्ध- ऑट्टोमन साम्राज्याने संधी केल्यावर मध्यपूर्वेतील युद्ध संपुष्टात आले.
 • १९२२: बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी.
 • १९२५: जॉन लोगी बेअर्डने पहिला दूरचित्रवाणी प्रसारण संच बनवला.
 • १९३८: रेडियोवरील एच.जी. वेल्सच्या वॉर ऑफ द वर्ल्ड्स या कथेचे नाट्यमय निरुपण ऐकून अमेरिकेतील लोकांना खरेच पृथ्वी व मंगळवासीयांत युद्ध सुरू झाल्याचे वाटले.
 • १९६०: मायकेल वूडरफने एडिनबर्गमधील एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी येथे सर्वप्रथम मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण केले.
 • १९७०: व्हियेतनाम युद्ध- प्रचंड मॉन्सून पावसामुळे दोन्हीकडच्या कारवाया थांबल्या.
 • १९७२: शिकागोमध्ये समोरासमोर लोकल रेल्वेगाड्या धडकून ४५ ठार, ३३२ जखमी.
 • १९७३: इस्तंबूलमधील बॉस्पोरस पूल बांधून पूर्ण झाल्यावर युरोप व एशिया जोडले गेले.
 • १९८०: एल साल्वाडोर आणि होन्डुरास मध्ये संधी.
 • १९९५: कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात ५०.६% वि ४९.४% मताने क्वेबेकने कॅनडातच राहणे पसंत केले.
 • २०१३: आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
३० ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२१८: चुक्यो, जपानी सम्राट.
 • १७३५: जॉन ऍडम्स, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८३९: आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.
 • १८८१: नरेंद्र देव, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते.
 • १८८२: विल्यम हॅल्सी, जुनियर, अमेरिकन दर्यासारंग.
 • १८९५: डिकिन्सन रिचर्ड्‌स, १९५६ चे वैद्यकीय नोबल पारितोषक विजेते.
 • १९०३: लेन हॉपवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०८: पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०९: डॉ. होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ.
 • १९४९: प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते.
 • १९६०: डियेगो माराडोना, आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू.
 • १९६२: कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: माइक व्हेलेटा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३० ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६११: चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.
 • १६५४: गो-कोम्यो, जपानी सम्राट.
 • १८९३: जॉन जोसेफ काल्डवेल ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.
 • १९१५: चार्ल्स टपर, कॅनडाचा सहावा पंतप्रधान.
 • १९७४: बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल'.
 • १९९०: विनोद मेहरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • १९९६: प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
 • १९९८: विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर मराठी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक.
 • १९९९: वसंत हळबे, व्यंगचित्रकार.
 • २०११: अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.