१७ ऑक्टोबर दिनविशेष

१७ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१७ ऑक्टोबर दिनविशेष | 17 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ ऑक्टोबर चे दिनविशेष


दादोबा पांडुरंग तर्खडकर / तथा दादोबा पांडुरंग - (९ मे १८१४ - १७ ऑक्टोबर १८८२) मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.

शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१७ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक गरिबी निर्मूलन दिन.

ठळक घटना / घडामोडी
१७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६६२: इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसर्‍याने डंकर्क फ्रांसला ४०,००० पाउंडला विकले.
 • १७८१: अमेरिकन क्रांती-यॉर्कटाउनची लढाई- जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिसने खंडीय सेनेसमोर शरणागती पत्करली.
 • १८००: इंग्लंडने कुरासावोची वसाहत नेदरलँड्सकडून घेतली.
 • १८०६: हैतीच्या सम्राट जाक पहिल्याची हत्या.
 • १९३१: माफिया डॉन अल कॅपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा.
 • १९३३: अल्बर्ट आइनस्टाइन जर्मनीतून पळून अमेरिकेत आला.
 • १९५६: जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले.
 • १९७३: सिरीयाविरुद्ध इस्रायलला मदत केल्याबद्दल ओपेकने पाश्चात्य देशांना खनिज तेल विकणे बंद केले.
 • १९८९: लोमो प्रियेता भूकंप- सान फ्रांसिस्को जवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.१ तीव्रतेचा भूकंप. ५७ ठार.
 • १९९८: जेसी, नायजेरिया येथे पेट्रोलवाहिकेतून गळणार्‍या पेट्रोलचा विस्फोट. हे पेट्रोल गोळा करणार्‍यांपैकी १,२०० ठार.
 • २००३: ताइपेइ १०१ या इमारतीच्या १०१व्या मजल्यावर कळस चढवण्यात आला. याबरोबरच ही इमारत कुआलालंपुरमधील पेट्रोनास टॉवरपेक्षा व जगातील सगळ्यात उंच इमारत झाली.
 • २००३: भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.
 • २००६: अमेरिकेची वस्ती ३० कोटीला पोचल्याचा अंदाज.

जन्म / वाढदिवस / जयंती
१७ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८१७: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
 • १८६९: भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू.
 • १८७८: बार्लो कार्कीक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८९०: रॉय किल्नर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९२: नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार.
 • १९१२: पोप जॉन पॉल पहिला.
 • १९१४: जेरी सीगेल, अमेरिकन चित्रकथाकार, सुपरमॅन या व्यक्तिमत्त्वाचा सहनिर्माता.
 • १९१५: आर्थर मिलर, अमेरिकन नाटककार.
 • १९१७: मार्टिन डोनेली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९१९: रिटा हेवर्थ, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९३५: ऍलन ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५५: स्मिता पाटील (भारतीय अभिनेत्री, मृत्यू: १३ डिसेंबर १९८६)
 • १९६२: माइक जज, अमेरिकन चित्रकथाकार, व्यंगचित्रकार.
 • १९६५: अरविंद डि सिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७०: अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७२: एमिनेम, अमेरिकन रॅप गायक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१७ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ५३२: पोप बोनिफेस दुसरा.
 • ११७४: पेट्रोनिला, अरागॉनची राणी.
 • १८८२: दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक.
 • १८८७: गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९५८: चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६७: हेन्री पु यी, शेवटचा चिनी सम्राट.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.