२५ ऑक्टोबर दिनविशेष

२५ ऑक्टोबर दिनविशेष - [25 October in History] दिनांक २५ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२५ ऑक्टोबर दिनविशेष | 25 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २५ ऑक्टोबर चे दिनविशेष


साहिर लुधियानवी / अब्दुल हयी - (८ मार्च १९२१ - २५ ऑक्टोबर १९८०) एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते.

शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२५ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९००: युनायटेड किंग्डमने ट्रान्सव्हाल बळकावले.
 • १९२०: चौर्‍याहत्तर दिवस उपोषण केल्यानंतर आयर्लंडच्या कॉर्क शहराच्या महापौर टेरेन्स मॅकस्वीनीचा मृत्यू.
 • १९४४: दुसरे महायुद्ध- अमेरिकेची यु.एस.एस. टँग पाणबुडी आपल्याच टॉरपेडोचा बळी ठरली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई- अमेरिका आणि जपानच्या आरमारात फिलिपाईन्सच्या आसपास घनघोर लढाई जुंपली.
 • १९४५: चीनने जपानकडून ताइपेइचा ताबा घेतला.
 • १९६२: युगांडाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • १९७१: चीनला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. ताइपेइची हकालपट्टी.
 • १९७७: डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने ओपनव्हीएमएस १.० प्रसिद्ध केले.
 • १९८३: ऑपरेशन अर्जंट फ्युरी- ग्रेनेडातील सशस्त्र उठावात पंतप्रधान मॉरिस बिशप व त्याच्या सहकार्‍यांच्या मृत्युदंडाच्या सहा दिवसांनी अमेरिकेने ग्रेनेडावर आक्रमण केले.
 • २००१: मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स. पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
 • २००७: एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.

जन्म / वाढदिवस / जयंती
२५ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३३०: लुई दुसरा, फ्लँडर्सचा राजा.
 • १८२५: योहान स्ट्रॉस दुसरा, ऑस्ट्रियन संगीतकार.
 • १८३८: जॉर्जेस बिझेत, फ्रेंच संगीतकार.
 • १८६४: अलेक्झांडर ग्रेत्चानिनोव्ह, रशियन संगीतकार.
 • १८६४: जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन मोटरकार उद्योजक.
 • १८८१: पाब्लो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.
 • १८८८: निल्स फोन डार्डेल, स्वीडिश चित्रकार.
 • १८९५: लेव्हि एश्कॉल, इस्रायलचा पंतप्रधान.
 • १९२१: मायकेल, रोमेनियाचा राजा.
 • १९२७: होर्हे बॅटले इबान्येझ, उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२५ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ६२५: पोप बॉनिफेस पाचवा.
 • ११५४: स्टीवन, इंग्लंडचा राजा.
 • १४००: जॉफ्री चॉसर, इंग्लिश साहित्यिक.
 • १४९५: होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा.
 • १६४७: एव्हांजेलिस्ता तोरिसेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ.
 • १७६०: जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १९२०: अलेक्झांडर, ग्रीसचा राजा.
 • १९६५: एडुआर्ड आइनस्टाइन, आल्बर्ट आइनस्टाइनचा मुलगा.
 • १९८०: साहिर लुधियानवी, हिंदी कवी आणि गीतकार.
 • २००३: पांडुरंगशास्त्री आठवले, हिंदू आध्यात्मिक गुरू.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.