८ ऑक्टोबर दिनविशेष - [8 October in History] दिनांक ८ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक ८ ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
भारतीय वायुसेना - भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
जागतिक दिवस
- -
- ३१४: सिबालेच्या लढाईत काँस्टन्टाइन पहिल्याने रोमच्या सम्राट लिसिनियसचा पराभव करून युरोपमधील प्रदेश ताब्यात घेतला.
- १०७५: दमितार झ्वोनिमिर क्रोएशियाच्या राजेपदी.
- १४८०: उग्रा नदीच्या काठी मोंगोल सेनापती अखमत खान आणि इव्हान तिसर्याच्या सैन्यांनी एकमेकांना रोखून धरले. येथून माघार घेतलेल्या मोंगोल सैन्याची पडती होत गेली.
- १६००: सान मारिनोने लिखित संविधान अंगिकारले.
- १८१३: रीडचा तह.
- १८२१: पेरूच्या सैन्यदलाची स्थापना.
- १८५६: दुसरे अफू युद्ध सुरू झाले.
- १८७१: मिशिगन सरोवराकाठी चार मोठ्या आगी लागल्या.
- १८७९: चिलेच्या आरमाराने पेरूच्या आरमाराचा पराभव केला.
- १८९५: जपानच्या सैन्याने सम्राज्ञी मिन या कोरियाच्या शेवटच्या सम्राज्ञीचा खून केला.
- १९१२: माँटेनिग्रोने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९१८: पहिले महायुद्ध, आर्गॉनच्या जंगलात अमेरिकेच्या कॉर्पोरल ऍल्विन सी यॉर्कने आपल्या तुकडीसह जर्मन सैन्यावर हल्ला चढवून २५ सैनिक ठार केले आणि १३२ युद्धकैदी पकडले.
- १९३२: भारतीय वायुसेनेची स्थापना.
- १९३९: दुसरे महायुद्ध, जर्मनीने पश्चिम पोलंड बळकावले.
- १९५२: हॅरो, इंग्लंड जवळ रेल्वे अपघातात ११२ ठार.
- १९६२: अल्जीरियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९६७: बोलिव्हियात शे ग्वेव्हाराला अटक.
- १९७३: यॉम किप्पुर युद्ध, इस्रायेलने आपल्या हद्दीत ठाण मांडून बसलेल्या इजिप्तच्या सैन्यावर हल्ला चढवला. १५० रणगाड्यांचा विनाशासह इस्रायेलचा पराभव.
- १९७४: अमेरिकेतील फ्रँकलिन नॅशनल बँकेने दिवाळे काढले.
- २००१: इटलीतील मिलानच्या विमानतळावर धुक्यात स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सिस्टमचे विमान एका छोट्या विमानास धडकले. ११८ ठार.
- २००५: पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. शेकडो ठार, हजारो बेघर.
- १८५०: हेन्री लुई ले शॅटेलिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८९१: शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.
- १८९५: हुआन पेरॉन, आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष.
- १८९५: झॉग पहिला, आल्बेनियाचा राजा.
- १९१८: जेन्स क्रिस्चियन स्कू, डेन्मार्कचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९१९: कीची मियाझावा, ७८वा जपानी पंतप्रधान.
- १९२८: नील हार्वे, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९३५: रवी परांजपे, भारतीय चित्रकार.
- १३१७: फुशिमि, जपानी सम्राट.
- १७३५: याँगझेंग, चीनी सम्राट.
- १८६९: फ्रँकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७: क्लेमेंट ऍटली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९८२: फिलिप नोएल-बेकर, कॅनडाचा नोबेल शांतता पुरस्कार विजेता.
- १९८७: काँस्टान्टिनोस त्सात्सोस, ग्रीसचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२: विली ब्रँड्ट, नोबेल शांतता पुरस्कार विजेता जर्मनीचा चान्सेलर.
- २०११: डेनिस रिची, C आज्ञावली परिभाषेचा जनक
ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय