१५ ऑक्टोबर दिनविशेष

१५ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १५ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१५ ऑक्टोबर दिनविशेष | 15 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १५ ऑक्टोबर चे दिनविशेष


डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम / ए. पी. जे. अब्दुल कलाम - (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१५ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • शिक्षक दिन: ब्राझिल.

ठळक घटना / घडामोडी
१५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५८२: पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम ऑक्टोबर १५ हा तारीख आली.
 • १८६३: एच.एल. हनली ही पाणबुडी आपल्या शोधक होरेस एल. हनलीसह बुडाली.
 • १८८०: मेक्सिकोच्या सैन्याने अपाची सरदार व्हिक्टोरियोला मारले.
 • १९१७: पहिले महायुद्ध- जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माटा हारीला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
 • १९३२: टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.
 • १९३९: न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे लग्वार्डिया विमानतळ) उद्घाटन.
 • १९३९: दुसरे महायुद्ध- विची फ्रांसच्या पंतप्रधान पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
 • १९४६: दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्ग खटला- आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री हेर्मान गोअरिंगने विष घेउन आत्महत्या केली.
 • १९५६: फोर्ट्रानचा उपयोग सुरू.
 • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमी येथे आपल्या उर्वरित सुमारे २ लक्ष अनुयायांसोबत दुसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
 • १९७०: मेलबोर्नमध्ये वेस्ट गेट पूलाचा भाग कोसळून ३५ कामगार ठार.
 • १९७०: एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.
 • १९९७: शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.
 • १९९७: गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले.
 • २००३: चीनच्या शेन्झौ ५ या पहिल्या समानव अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • २००३: स्टेटन आयलंड फेरी अँड्रु जे. बार्बेरी स्टेटन आयलंड येथील धक्क्याला धडकली. ११ ठार, ४३ जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१५ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५४२: अकबर, मोगल बादशहा.
 • १६०८: टॉरिसेली, हवाभारमापकाचा चा इटालियन संशोधक.
 • १९२३: गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.
 • १९३१: डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती.
 • १९५७: मीरा नायर, भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१५ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ८९८: लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट.
 • १३८९: पोप अर्बन सहावा.
 • १९१८: साई बाबा (शिर्डी).
 • १९३०: हर्बर्ट हेन्री डाउ, अमेरिकन उद्योगपती.
 • १९४५: पिएर लव्हाल, विची फ्रांसचा पंतप्रधान.
 • १९४६: हेर्मान गोरिंग, नाझी अधिकारी.
 • १९६१: सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.
 • १९८७: थॉमस संकरा, बर्किना फासोचा क्रांतीकारी.
 • २०००: कॉन्राड एमिल ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.