Loading ...
/* Dont copy */

एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात GEO-FEST 2026 संपन्न

एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात GEO-FEST 2026 संपन्न; भूगोलातील संकल्पनांवर आधारित प्रारूप व पोस्टर स्पर्धेत विद्यार्थिनींचे सर्जनशील सादरीकरण.

एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात GEO-FEST 2026 उत्साहात संपन्न

GEO-FEST 2026 मध्ये भूगोलातील संकल्पनांचे सर्जनशील प्रारूप व पोस्टर्सचे प्रभावी सादरीकरण...

एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात GEO-FEST 2026 संपन्न

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

ठळक मुद्दे

• एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे दोन दिवसीय ‘GEO-FEST 2026’चे आयोजन. • विद्यार्थिनींकडून भूगोलातील विविध संकल्पनांवर आधारित २४ सर्जनशील प्रारूपे व पोस्टर्सचे सादरीकरण. • प्रा. डॉ. अर्जुन डोके यांचे मार्गदर्शन; सर्जनशीलता व संशोधनवृत्तीला चालना मिळाल्याचे मत. • उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास व विषयातील रुची वाढल्याचा उपस्थितांचा निष्कर्ष.

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी GEO-FEST 2026 या दोन दिवसीय शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भूगोल विषयातील विविध संकल्पनांचे आकलन अधिक सुलभ, रचनात्मक आणि प्रत्यक्ष अनुभवातून व्हावे, या उद्देशाने भौगोलिक प्रारूप (मॉडेल्स) व पोस्टर निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथील प्रा. डॉ. अर्जुन डोके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रारूपांमधून भूगोलातील सैद्धांतिक व व्यावहारिक ज्ञानाचा सुरेख समन्वय दिसून येतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींची सर्जनशीलता वाढते आणि संशोधनवृत्ती विकसित होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी मार्गदर्शन करताना अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विषयाचे प्रत्यक्ष आकलन करणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. भूगोल विभागाचे विभागप्रमुख डॉ. रविंद्र हांडे यांनी प्रास्ताविकात GEO-FEST ही संकल्पना विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

या उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. प्रविण गायकवाडप्रा. आरती लोंढे यांनी प्रभावी नियोजन करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमास भूगोल विभागातील प्रा. ज्योती कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेत विद्यार्थिनींनी हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, भूआकृती प्रक्रिया, जलसंधारण, भूवापर नमुने आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या विषयांवर आधारित एकूण २४ भौगोलिक प्रारूपे व पोस्टर्स सादर केली.

या प्रदर्शनाचे परीक्षण डॉ. पीयूष तेलंग आणि डॉ. अशोक कोकाटे यांनी परीक्षक म्हणून केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या कल्पकता, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. GEO-FEST 2026 मुळे विद्यार्थिनींमध्ये भूगोल विषयाबद्दल अधिक रुची निर्माण होऊन आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट झाले. हा उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

एसएनडीटी पुणे यासंबंधी इतर बातम्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची