Loading ...
/* Dont copy */

जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं उलगडणार.

जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतून समाजसुधारणेच्या इतिहासातील जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे...

जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

ठळक मुद्दे

• जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ लहुजी वस्ताद यांची मालिकेत प्रभावी एण्ट्री होणार आहे. • गुरु-शिष्यापलीकडे जाऊन विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक ठरलेलं हे नातं मालिकेत सविस्तर उलगडण्यात येणार आहे. • फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याला लहुजी वस्तादांनी दिलेला खंबीर पाठिंबा विशेषत्वाने दाखवण्यात येणार आहे. • सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते लहुजी वस्तादांच्या भूमिकेत झळकणार आहेत.

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले या मालिकेत लवकरच समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या लहुजी वस्ताद यांची मालिकेत दमदार एण्ट्री होणार आहे.

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद, अर्थात लहुजी राघोजी साळवे, यांनी ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी १८२२ मध्ये एक तालीम सुरू केली आणि पुण्यातील मुलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. शस्त्रशिक्षण घेण्यासाठी जोतीराव फुले लहुजींच्या तालमीत येत असत. जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं नातं केवळ गुरु-शिष्याचं नव्हतं, तर विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक होतं.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली तेव्हा या दाम्पत्याला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. मात्र लहुजी वस्ताद या दोघांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठबळावर जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला साथ देत अस्पृश्य बांधवांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठीही लहुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांचं नातं केवळ ऐतिहासिक संदर्भापुरतं न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मालिकेच्या माध्यमातून सादर केलं जाणार आहे. इतिहासातील हा महत्त्वाचा अध्याय अनुभवण्यासाठी मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर नक्की पाहा.

मराठी टिव्ही यासंबंधी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची