Loading ...
/* Dont copy */

नात्यांमध्ये विश्वास व संवादाचे महत्त्व (चैताली गिते)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका चैताली गिते यांचा नात्यांमध्ये विश्वास व संवादाचे महत्त्व हा मराठी लेख.

नात्यांमध्ये विश्वास व संवादाचे महत्त्व (श्रीमती चैताली गिते)

नात्यांचे बंध दृढ ठेवण्यासाठी विश्वास आणि संवाद किती आवश्यक आहेत, याचे संवेदनशील विश्लेषण करणारा लेख...

नात्यांमध्ये विश्वास व संवादाचे महत्त्व

श्रीमती चैताली गिते (मराठा हायस्कूल, नाशिक)

या लेखात काय वाचाल

• मानवी जीवनातील नातेसंबंधांचा पाया विश्वास आणि संवादावर उभा असतो. • संवादाअभावी नाती बाहेरून टिकलेली भासली तरी आतून पोकळ होत जातात. • आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यस्त जीवनशैलीमुळे भावनिक अंतर वाढत आहे. • संवाद, सहनशीलता आणि अहंकाराचा त्याग केल्यास नाती अधिक घट्ट बनू शकतात.

मानवी जीवनात नातेसंबंध आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे; तो एकटा राहू शकत नाही. एकटा जगू शकत नाही म्हणून समाजनिर्मिती झाली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक नात्यांमध्ये गुंतलेलो असतो—आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, शिक्षक, नातेवाईक आणि समाजातील इतर अनेक व्यक्ती. या नात्यांमुळे आपले जीवन अर्थपूर्ण व सुंदर बनते.

या सर्व नात्यांचा मजबूत पाया म्हणजे विश्वास आणि संवाद. कारण विश्वासाशिवाय नाते घडतच नाही. विश्वास हा कोणत्याही नात्याचा आधारस्तंभ आहे. ज्या नात्यात विश्वास असतो ते नाते अधिक मजबूत, घट्ट आणि आनंददायी ठरते. अशा नात्यात आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो, मनातील गोष्टी सांगू शकतो आणि अडचणीच्या काळात आधार मागू शकतो. म्हणून मानवी आयुष्यात विश्वासाला अतिशय महत्त्व आहे; किंबहुना तो प्रत्येक नात्याचा कणा आहे.

प्रत्येक नाते जपण्यासाठी सहनशीलता आणि संवाद आवश्यक असतो. आपल्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार, स्वभाव, दृष्टिकोन आणि विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते. त्यामुळे मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र हे मतभेद शांतपणे सोडवणे आणि एकमेकांची बाजू समजून घेणे हीच नात्याची खरी ताकद आहे. जिथे संवाद संपतो, तिथे नाते हळूहळू कमकुवत होऊ लागते.

संवाद नसलेल्या नात्यात बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आतून नातं रिकामं होत जातं. लोक शारीरिकदृष्ट्या जवळ असतात, मात्र मनाने दूर गेलेले असतात. अशा नात्यात आनंद, विश्वास आणि आपुलकी कमी होत जाते. ही शांतता समाधानाची नसून तुटलेल्या भावनांची खूण ठरते. कधी नातं टिकवण्यासाठी औपचारिक बोलणे केले जाते, पण मनापासून संवाद नसल्याने प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी हरवते.

आजच्या आधुनिक काळात संवादहीन नाती वाढण्यामागे तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि व्यस्त जीवनशैली यामुळे प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. एकाच घरात राहूनही लोक मनमोकळा संवाद साधत नाहीत. एकमेकांच्या भावनांचा आदर केला जात नाही आणि त्यामुळे भावनिक अंतर वाढत चालले आहे.

संवादासाठी वेळ देणे ही आजची गरज बनली आहे. संवाद म्हणजे फक्त बोलणे नाही, तर ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, तिला वेळ देणे आणि प्रामाणिकपणे संवाद साधणे हे नात्याला अधिक घट्ट बनवते. नाते दूर जाण्याचे दुसरे कारण म्हणजे अहंकार. अहंकार बाजूला ठेवला तर छोटा संवादही मोठे अंतर कमी करू शकतो.

शेवटी एवढेच म्हणता येईल की नाते टिकवायचे असेल तर संवाद जिवंत ठेवावा लागतो. संवाद नसलेले नाते त्या झाडासारखे असते ज्याला पाणी मिळत नाही आणि ते हळूहळू कोमेजून जाते. म्हणून नात्यांमध्ये संवाद साधा, विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा.

श्रीमती चैताली गिते यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची