Loading ...
/* Dont copy */

हरवलेलं गावपण - मराठी कविता (मोहिनी उत्तर्डे)

हरवलेलं गावपण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री मोहिनी उत्तर्डे यांची हरवलेलं गावपण ही कविता.

हरवलेलं गावपण - मराठी कविता (मोहिनी उत्तर्डे)

हरवलेल्या गावपणाची वेदना आणि गोड आठवणी यांचा भावनिक संगम मांडणारी कविता... हरवलेलं गावपण

हरवलेलं गावपण

मोहिनी उत्तर्डे (महाराष्ट्र, भारत)

ही कविता गावाच्या मातीशी जोडलेल्या आठवणींचा भावनिक पट उलगडते. निसर्ग, सण, खेळ आणि नात्यांतला निरागस आनंद ती टिपते. गरिबी असूनही समृद्ध असलेलं बालपण शब्दांत उतरवत जाते. शहरात हरवलेल्या गावपणाची उणीव गोड आठवणींतून व्यक्त करते. ही कविता ग्रामीण जीवनातील हरवलेल्या साधेपणाची आणि निरागसतेची हळवी जाणीव करून देते. निसर्ग, सण-उत्सव, खेळ, चालीरीती आणि दैनंदिन जगण्यातील लहानसहान गोष्टी यांतून गावपणाचा आत्मा उलगडत जातो. दृश्यात्मक प्रतिमा आणि गंध-स्पर्शप्रधान अनुभव यामुळे कविता वाचकाला थेट आठवणींच्या विश्वात घेऊन जाते. कवितेतील बालपणाचे चित्रण विशेष प्रभावी आहे. भौतिक कमतरता असूनही मनाने श्रीमंत असलेले जगणे येथे प्रकर्षाने जाणवते. शाळा, खेळ, अन्न, स्वप्ने—या सगळ्यांतून सामूहिकतेचा आणि समाधानाचा भाव अधोरेखित होतो, जो आजच्या एकाकी जीवनशैलीशी सूचक तुलना करतो. शेवटच्या टप्प्यात कविता वर्तमानाशी भिडते. गावाकडचे क्षण आणि नाती प्रत्यक्षात हरवलेली असली, तरी स्मृतींच्या रूपाने ती अजून जिवंत आहेत, ही भावना तीव्रपणे व्यक्त होते. त्यामुळे ही कविता केवळ आठवणींची नोंद न राहता बदलत्या काळावर केलेले मूक भाष्य ठरते.

हरवली ती गावकडची वाट, त्या डोंगरी कडे अन् कपाटं, हरवलं ते गर्द, निरभ्र आकाश, सोबत काजव्यांचा लख्ख प्रकाश... मोगऱ्याचा दारी दरवळणारा सुगंध, तापलेल्या मातीचा मधूर असा गंध, वडाखालचा सुरपारुब्यांचा तो खेळ, नात्यांचा लपंडाव खेळणारी ही सांजवेळ... आठवते वांगसटीची, मल्लाराची वारी, तिळगुळ पण आनंदाने वाटायचो दारोदारी, रंगपंचमीचा झोका नभी भिडायचा, नंदीबैलाचा आवाज गावी घुमायचा... शाळेत जाताना डब्बा रिकामा असायचा, तरी प्रत्येक जण आनंदात दिसायचा, कच्ची कैरी तिखट-मीठ लावून खायचो, स्वप्नातलं घर मात्र मातीत बांधायचो... नवरात्रीचा दांड्यांचा नाद घुमतोय कानी, सोनसाखळीची पकड राहिली मात्र ध्यानी, हरवले ते गावाकडचे क्षण आणि नाती, आता फक्त उरल्यात गोड आठवणी...

मोहिनी उत्तर्डे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची