Loading ...
/* Dont copy */

फक्त तुझ्यासाठी - मराठी कविता (शालिनी बेलसरे)

फक्त तुझ्यासाठी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री शालिनी बेलसरे यांची फक्त तुझ्यासाठी ही मराठी कविता.

फक्त तुझ्यासाठी - मराठी कविता (शालिनी बेलसरे)

विरहाच्या आठवणी, ओढ आणि न स्वीकारता येणाऱ्या वास्तवाची हळवी अभिव्यक्ती करणारी कविता...

फक्त तुझ्यासाठी

शालिनी बेलसरे (अंजनगाव सुर्जी, अमरावती)

कवयित्रीच्या मनात प्रिय आईच्या आठवणी पावसासारख्या कोसळत राहतात. त्या आठवणींमुळे अंतर्मनात वादळ, अस्वस्थता आणि ओढ निर्माण होते. परत येण्याची आस असूनही काही वाटा पुन्हा मिळत नाहीत, हे वास्तव कवितेत स्वीकारले जाते. शेवटी दुःख, पाऊस आणि भावना या सगळ्यांचा ओघ एकटाच — पण फक्त तिच्यासाठी वाहत राहतो.

तुझ्या आठवणींचे आभाळ मनात गच्च काळोखते, अधूनमधून डोळ्यांतून मग मुसळधारेने बरसते. विजांचाही गडगडाट हृदयी खोलवर रुजत राहतो, तुझ्यासोबतचा क्षण अन् क्षण मग परत पलटून मागतो. वादळ तुझ्या आठवांचे असेच मनात कोंडताना, उगाच चिडचिड होते आयुष्यात जगताना. वाटते तू परत यावी, परत एकदा वळून, खूप काही सांगावे तुला, रडावे तुला बिलगून. पण जाणाऱ्या पाऊलवाटा कधी परत येत नसतात, असेच कोसळणारे ढग कुठे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. पावसात ऊन-सावलीचा खेळ चालणारच आहे पाठोपाठी, मी आणि माझा पाऊस बरसतो फक्त तुझ्यासाठी.

शालिनी बेलसरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची