२१ ऑक्टोबर दिनविशेष

२१ ऑक्टोबर दिनविशेष - [21 October in History] दिनांक २१ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२१ ऑक्टोबर दिनविशेष | 21 October in History

दिनांक २१ ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


आल्फ्रेड बर्नाल्ड नोबेल - (२१ ऑक्टोबर १८३३ - १० डिसेंबर १८९६) हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते.


जागतिक दिवस
 • सफरचंद दिन: युनायटेड किंग्डम.
 • अनिवासी चिनी दिन: चीन.
ठळक घटना / घडामोडी
 • १५२०: फर्डिनांड मॅगेलन मॅगेलनच्या सामुद्रधुनीत पोचला.
 • १८२४: जोसेफ ऍस्पडिनने पोर्टलँड सिमेंटचा पेटंट घेतला.
 • १८६७: मॅनिफेस्ट डेस्टिनी-मेडिसिन लॉजचा करार- स्थानिक अमेरिकन लोकांना पश्चिम ओक्लाहोमामध्ये स्थलांतर करणे भाग पाडले गेले.
 • १८७९: थॉमस अल्वा एडिसनने पहिल्यांदा कार्बन तंतू वापरून विजेचा दिवा चालवला. साडेतेरा तास चालल्यावर हा दिवा विझला.
 • १८९५: जपानने फॉर्मोसाचे प्रजासत्ताक जिंकले.
 • १९४३: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई- एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया वर जपानी विमानांनी आत्मघातकी हल्ला चढवला.
 • १९४५: फ्रांसमध्ये स्त्रीयांना पहिल्यांदाच मतदानाची संधी.
 • १९५९: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने वटहुकुम काढून वर्नर फोन ब्रॉन व त्याच्या सहकार्‍यांना अमेरिकन सैन्याच्या आधिपत्याखालून काढून घेउन नासामध्ये काम करण्यास फर्मावले.
 • १९६६: वेल्स च्या ऍबरफॅन गावावर कोळश्याच्या खाणीतून आलेल्या ढिगार्‍याखाली अनेक बालकांसह १४४ ठार.
 • १९६९: सोमालियात लश्करी उढाव. सियाद बारे सत्तेवर.
 • १९८३: निर्वात जागेतून १/२९,९७,९२,४५८ सेकंदात प्रकाशाने पार पाडलेल्या अंतर ही मीटरची व्याख्या ठरवली गेली.
 • १९९४: सोलमधील सेओंग्सू पूल कोसळून ३२ ठार.
जन्म / वाढदिवस
 • १६६०: जॉर्ज अर्न्स्ट स्टाल, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
 • १६७५: हिगाशीयामा, जपानी सम्राट.
 • १६८७: निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
 • १७१२: सर जेम्स स्ट्युअर्ट, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
 • १७९०: आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
 • १८२१: एदुआर्द हाइन, जर्मन गणितज्ञ.
 • १८३३: आल्फ्रेड नोबेल, स्विडीश रसायनशास्त्रज्ञ.
 • १८५१: जॉर्ज उलियेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१४: मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
 • १९१६: राम मराठे, मराठी संगीतकार.
 • १९१७: राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
 • १९२३: सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
 • १९४०: जॉफ बॉयकॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४९: बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.
 • १९५२: ट्रेव्हर चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: वॉल्फगांग केटर्ल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९५९: केन वाटानाबे, जपानी अभिनेता.
 • १९६९: सलमान विन हमाद बिन इसा अल खलिफा, बहरैनचा युवराज.
 • १९७१: डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९९८: अजित, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १२६६: बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
 • १४२२: चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
 • १५००: गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
 • १५०५: पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
 • १६८७: सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
 • १७७७: सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
 • १८०५: होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
 • १८७२: जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८७३: योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.

ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.