इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ ऑक्टोबर चे दिनविशेष
दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार - (५ ऑगस्ट १८९० - ६ ऑक्टोबर १९७९) मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.
शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२१
जागतिक दिवस
६ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- सेना दिन: इजिप्त.
ठळक घटना / घडामोडी
६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६८३: विल्यम पेन आपल्याबरोबर जर्मनीतून १३ कुटुंबांना अमेरिकेत घेउन आला.
- १७८९: फ्रेंच राज्यक्रांती, नागरिकांनी दबाव आणल्यामुळे लुई सोळावा व्हर्सायहून पॅरिसला आला.
- १९०८: ऑस्ट्रियाने बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.
- १९५५: युनायटेड एरलाइन्सचे डी.सी.-४ प्रकारचे विमान वायोमिंगमधील मेडिसिन बो पीक या शिखरावर कोसळले. ६६ ठार.
- १९७६: सी.आय.एच्या हस्तकांनी ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट होउन क्युबाना फ्लाइट ४५५ हे विमान ब्रिजटाउन, बार्बाडोस सेथे कोसळले. ७३ ठार.
- १९८१: इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची हत्या.
- १९८७: फिजी प्रजासत्ताक झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
६ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२८९: वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
- १७७३: लुई-फिलिप, फ्रांसचा राजा.
- १८६७: व्हिकटर बार्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७: जॉर्ज ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९००: मॉरिस निकोल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४: थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.
- १९२९: लेस फावेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३०: हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३०: रिची बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४६: टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५६: मरे बेनेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५: इयान ऍलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५: रियॉन किंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६: संजय राउल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७८: क्रिस शोफिल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
६ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४१३: दावित पहिला, इथियोपियाचा सम्राट.
- १६६१: गुरू हर राय, सातवे शिख गुरू.
- १८९२: आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
- १९७९: दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- १९८१: अन्वर अल सादात, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२: बिल ओ'रायली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |