Loading ...
/* Dont copy */

ट्रिप टू राजस्थान भाग १ - भयकथा (इंद्रजित नाझरे)

ट्रिप टू राजस्थान भाग १ - भयकथा (इंद्रजित नाझरे) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची ट्रिप टू राजस्थान भाग १ ही मराठी भयकथा.

ट्रिप टू राजस्थान भाग १ भयकथा (इंद्रजित नाझरे)

सात वर्षांनंतर एकत्र आलेल्या पाच मैत्रिणींची राजस्थान सहल एका रहस्यमय आणि भीतीदायक प्रवासाची सुरुवात ठरते...

ट्रिप टू राजस्थान भाग १

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)

प्रस्तावना
मैत्री, साहस आणि उत्सुकता यांच्या संगमातून कधीकधी असे प्रवास सुरू होतात, जे केवळ पर्यटन न राहता अनुभवांचा गूढ पट उलगडत जातात. पाच धाडसी मुलींच्या आयुष्यातही अशीच एक सहल अचानक आकार घेते. सुरुवातीला साधी वाटणारी ही योजना पुढे भय, तणाव आणि रहस्याच्या दिशेने वळण घेते—जिथे मैत्रीची परीक्षा, धैर्याची कसोटी आणि अज्ञाताचा सामना एकाच वेळी उभा राहतो.

स्नेहल पाटील, निशा देसाई, पल्लवी देशमुख, निकिता कुमठेकर आणि कोमल देशपांडे— या पाच सुंदर आणि धाडसी मुलींचा भीतीदायक प्रवास म्हणजेच ट्रिप टू राजस्थान…! ट्रिंग… ट्रिंग…! फोन वाजला. सकाळचे सात वाजले होते. एफ.एम.वरून वेळही जाहीर झाली. मी माझ्या गोड स्वप्नातून जागी झाले. डोळे मिचकावत फोनकडे पाहिले तर स्क्रीनवर नाव झळकत होते—“एस जान…!” म्हणजेच माझी खास मैत्रीण स्नेहडी, स्नेहलचा फोन. मी पटकन बेडवरून उठले आणि तशीच गॅलरीत जाऊन फोन उचलला. “गुड मॉर्निंग, निकडे…! कशी आहेस तू?” स्नेहल बोलत होती. स्नेहल पाटील—आमच्या कॉलेजमधील अत्यंत सुंदर आणि आत्मविश्वासू मुलगी. तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि चपळाई पाहिली की जणू हॅरी पॉटर चित्रपटातील हर्मायनी ग्रेंजरच आपल्या जादूई छडीसह समोर उभी आहे, असे वाटायचे. “मी ठीक आहे… जान, तू सांग! किती वर्षांनी फोन केला आहेस तू? आत्ता माझी आठवण झाली का?” मी थोड्या भावनिक सुरात विचारले. त्यावर स्नेहल लगेच म्हणाली, “ए काकूबाई, माझा सकाळचा फ्रेश मूड आणि मम्माने केलेला चहा खराब करू नकोस. तू अजूनही तशीच आहेस—काहीच बदल झाला नाही तुझ्यात!” मीही हसत म्हणाले, “एकदम बिनधास्त! तू तरी कुठे बदलली आहेस?” स्नेहल लगेच म्हणाली, “पूर्वीही काकूबाई होतीस आणि आताही तशीच!” थोड्या गप्पांनंतर स्नेहल म्हणाली, “ऐक ना… मी म्हणत होते की तू, मी, निशी आणि पल्लू—आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊयात का?” मी लगेच म्हणाले, “आणि कोमल?” कोमलचे नाव ऐकताच स्नेहल क्षणभर शांत झाली. “हॅलो… हॅलो…!” मी दोनदा विचारले. “मी तिला फोन करणार नाही,” ती ठामपणे म्हणाली. “कारण तुला माहित आहे…!” दोघींमधील जुना वाद मला आठवला. स्नेहल खोडकर आणि धाडसी; तर कोमल शांत पण हुशार. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच दोघींचे कधीच पटत नव्हते. मांजरांसारख्या भांडणाऱ्या त्या दोघी कायम वाद घालत असत. मी म्हणाले, “कोमल येणार असेल तरच ट्रिपचा प्लॅन करूया.” स्नेहल क्षणभर थांबली आणि म्हणाली, “बरं, घेऊयात तिलाही… पण माझ्या वागण्यात मी काही बदल करणार नाही. अंडरस्टँड?” मी खूप खुश झाले. तब्बल सात वर्षांनंतर आम्ही पुन्हा ‘हम पाँच’सारख्या एकत्र येणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी कॅफे कॉफी डे मध्ये पोहोचले. आत पाहिले तर निशा आणि पल्लवी आधीच येऊन कॉफी घेत बसल्या होत्या. मी हळूच त्यांच्या मागे जाऊन उभी राहिले आणि दोघींच्या डोळ्यांवर हात ठेवला. काही क्षणांतच त्या म्हणाल्या, “निकी डिअर…!” मी हसत त्यांच्या समोर बसले. “अगं, कोमी अजून आली नाही का?” मी विचारले. निशा हसत म्हणाली, “हो, कॉल केला होता. मॅडम देवपूजा करत आहेत.” पल्लवीने कॅपुचिनो ऑर्डर दिली. आम्ही तिघी कॉफी घेणार इतक्यात बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. आम्ही लगेच ओळखले—स्नेहल आली होती. काळ्या रंगाच्या जिप्सीमधून ती अगदी चित्रपटातील हिरोसारखी येत होती. बाजूला उभे असलेले दोन तरुण तिच्याकडे टक लावून पाहत होते. स्नेहलने त्यांच्या नजरेतील भावना लगेच ओळखल्या आणि मुद्दाम गाडी त्यांच्या दिशेने स्लीप केली. जिप्सी अंगावर येईल या भीतीने ते दोघे आपली दुचाकी तिथेच सोडून पळून गेले. आम्ही तिघी काचेच्या दरवाजातून ते सगळं पाहत होतो. स्नेहल गाडीतून उडी मारून खाली उतरली. काळी घट्ट जीन्स, चॉकलेटी स्कर्ट, घुंगराळे केस, काळा गॉगल आणि तोंडात च्युइंग गम—ती अगदी तिच्याच स्टाइलमध्ये आमच्याकडे चालत येत होती. ती आत आली की गडबड होणार नाही, असे कधीच होत नसे. वेटरच्या हातातील कॉफी आमच्या अंगावर पडता पडता राहिली. “हे पुरानी जिन्स…!” असे म्हणत स्नेहल आमच्या तिघींच्या गळ्यात पडली आणि मोठ्याने हसू लागली. तिचा आवाज घोगरा असल्यामुळे कॅफेतील सर्व ग्राहक आमच्याकडे पाहू लागले. पल्लवीने नजरेने तिला शांत बसायला सांगितले. थोड्याच वेळात गप्पा रंगल्या—जुन्या आठवणी, सध्याचे आयुष्य… सगळं. स्नेहल सेल्फी घेणार इतक्यात तिच्या नजरेस कोमल देशपांडे पडली. “हं, घ्या! आणखी एक काकूबाई…!” ती म्हणाली. कोमल साध्या चुडीदार ड्रेसमध्ये आत आली. “काय गं, आज कसं एकत्र जमायचं ठरवलंत?” तिने विचारले. निशा म्हणाली, “काही नाही गं… स्नेही म्हणाली की आपण कुठेतरी दूर फिरायला जाऊयात. तेच ठरवायला आलो.” “दूर? म्हणजे कुठे?” कोमलने लगेच प्रश्न केला. स्नेहल मग खाली ठेवत म्हणाली, “ओ मॅडम… दूर म्हणजे आपण काही अवकाशात जात नाही आहोत!” “ए, तू गप्प बस,” कोमलने तिच्या हातावर हलकेच मारले. दोघी पुन्हा वाद घालू लागल्या. मी लगेच म्हणाले, “कटेट… कटेट!” त्यावर त्या दोघी शांत झाल्या. “बरं, कुठे जाऊयात?” निशाने विचारले. मी आणि स्नेहल फोन काढून पर्यटनस्थळे पाहू लागलो—वीणा वर्ल्ड, केसरी टूर्स… पण आमचं एकमत होत नव्हतं. इतक्यात शांत बसलेली पल्लवी अचानक म्हणाली, “राजस्थानला जाऊयात.” “राजस्थान?” मी आश्चर्याने विचारले. “हो यार,” स्नेहल लगेच म्हणाली, “तिथे खूप काही बघण्यासारखं आहे—किल्ले, महाल, वाळवंट…” मी थोडा विचार करून लगेच होकार दिला. आम्ही चौघींनी आनंदाने टाळी दिली. पण कोमलचे लक्ष नव्हते. स्नेहलने तिच्या डोक्यात हलकी टपली मारली. ती भानावर आली आणि पुन्हा दोघींचा वाद सुरू झाला. त्याच रात्री आम्ही घरच्यांकडून परवानगी मागितली. बऱ्याच वेळाने आमच्या चौघींना परवानगी मिळाली; पण कोमलच्या घरचे मात्र तयार नव्हते. तिने मला फोन करून सांगितले. मी तिच्या आईशी बोलले आणि अखेर त्यांनाही तयार केले. अशा प्रकारे या पाच सुंदर आणि धाडसी मुलींचा भयप्रवास सुरू झाला. या प्रवासात त्या एकमेकींशी मनापासून जोडल्या जातात. स्नेहल पाटील आणि कोमल देशपांडे—ज्या नेहमी भांडत असत—त्या हळूहळू घट्ट मैत्रिणी बनतात. आणि धाडसी, आकर्षक स्नेहलच्या आयुष्यातही या प्रवासात काही गुलाबी क्षण डोकावू लागतात.

संपादकीय विश्लेषण
ही कथा मैत्री, साहस आणि तरुणाईच्या उत्साहातून उगम पावणाऱ्या प्रवासाची सुरुवात प्रभावीपणे मांडते. सुरुवातीच्या संवादप्रधान रचनेमुळे पात्रांचे स्वभाव स्पष्टपणे उभे राहतात. विशेषतः स्नेहल आणि कोमल यांच्यातील संघर्षात्मक नातेसंबंध कथेला गतिमान करतात. या विरोधाभासी स्वभावांमुळे पुढील कथानकात होणाऱ्या बदलांची आणि नात्यांतील रूपांतरणाची शक्यता वाचकाला जाणवते. कथानकात साध्या दैनंदिन प्रसंगांमधून वातावरणनिर्मिती केली आहे. फोन कॉल, कॅफेतील भेट, गप्पा आणि सहलीचे नियोजन या घटनांमधून पात्रांचे परस्पर संबंध आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची ओळख हळूहळू उलगडते. विशेषतः स्नेहलच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस, आत्मविश्वास आणि थोडासा बेफिकीर स्वभाव कथेला रंगतदार बनवतो. भयकथेची सुरुवात थेट भीतीदायक घटनांनी न करता मैत्रीपूर्ण आणि हलक्या वातावरणातून केली आहे. ही पद्धत कथेला वास्तववादी आधार देते आणि पुढे उलगडणाऱ्या गूढ घटनांसाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार करते. अशा प्रकारची संथ सुरुवात वाचकाला पात्रांशी जोडून ठेवते, ज्यामुळे पुढे येणाऱ्या भयप्रसंगांचा परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण होते. भाषिकदृष्ट्या कथा संवादप्रधान असल्यामुळे तिची गती चांगली टिकून राहते. तरुण पात्रांच्या बोलण्यातला नैसर्गिकपणा आणि अनौपचारिकता कथेला वास्तववादी बनवते. त्याच वेळी वर्णनात्मक भागांमध्ये वातावरणनिर्मितीची क्षमता दिसून येते. या कथाभागात मुख्यतः प्रवासाची तयारी आणि पात्रांमधील नात्यांची बीजे रोवली जातात, जी पुढील भयप्रसंगांसाठी मजबूत पायाभूत रचना तयार करतात. सारांश: पाच मैत्रिणींच्या सहलीच्या साध्या नियोजनातून सुरू झालेली ही कथा पुढे मैत्री, साहस आणि गूढ भयप्रवासाची सुरुवात सूचित करते.
हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची