बाभळ आणि सागवान - इसापनीती कथा

बाभळ आणि सागवान, इसापनीती कथा - [Babhal Aani Sagvan, Isapniti Katha] दुबळेपणा दाखवून आणि करुणा भाकून जिवंत राहण्यापेक्षा लढता लढता आलेले मरण अधिक भूषणास्पद होय.
बाभळ आणि सागवान - इसापनीती कथा | Babhal Aani Sagvan - Isapniti Katha
एकदा एक बाभळ शेजारच्या सागवानास म्हणाली, ‘अरे, तुला आपल्या शक्तीचा मोठा गर्व वाटतो, पण मोठे वादळ झाले असता, त्यात तू टिकतोस का मी टिकते हे आता प्रत्यक्षच पाहू.’

काही वेळाने मोठे वादळ होऊन त्यात सागवान ताठ उभा राहिल्यामुळे वाऱ्याच्या जोराने मुळासकट उन्मळून पडला व बाभळीने नम्रतेने आपल्या खांदया वाकविल्यामुळे ती सुरक्षित राहिली.

वादळ संपल्यावर बाभळ मोठया डौलाने सागवानास म्हणते, ‘कोणाचा पराभव झाला, माझा की तुझा?’ यावर सागवान उत्तर करतो, ‘अगं, या गोष्टीला तू शक्तीची परीक्षा समजतेस तर मग तुझ्या मूर्खपणाची कमाल झाली असे म्हटले पाहिजे. तू जी अदयाप उभी आहेस याचे कारण तुझी अशक्तता.

वादळाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य तुला नसल्यामुळे तू खाली मान घालून नम्रता दाखवलीस. पण माझी गोष्ट तशी नाही.

मी लढता लढता पडलो, दुबळेपणा दाखवून आणि करुणा भाकून जिवंत राहण्यापेक्षा लढता लढता आलेले मरण अधिक भूषणास्पद होय!’

तात्पर्य: दुबळेपणा दाखवून आणि करुणा भाकून जिवंत राहण्यापेक्षा लढता लढता आलेले मरण अधिक भूषणास्पद होय.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.