डोमकावळा आणि साप

डोमकावळा आणि साप, इसापनीती कथा - [Domkavala Aani Saap, Isapniti Katha] जो पदार्थ आपणास मिळविता येणे शक्य नाही आणि मिळाला तरी पचन होणे शक्य नाही, तो पदार्थ अधाशीपणाने खाऊन जाणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे होय.
डोमकावळा आणि साप - इसापनीती कथा | Domkavala Aani Saap - Isapniti Katha
एक भुकेलेला डोमकावळा भक्ष्याच्या शोधात असता, नदीकाठी बसलेला एक साप त्याने पाहिला.

मग त्याने झडप घालून त्यास आपल्या चोचीत धरले आणि आता मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेढे घालून आणि त्याच्या मानेस दंश करून त्याचा तत्काळ प्राण घेतला.

मरतेवेळी तो डोमकावळा म्हणाला, ‘दुसऱ्यास मारून स्वतःची क्षुधा शांत करू इच्छिणारास हे पारिपत्य सर्वस्वी योग्य आहे.’

तात्पर्य: जो पदार्थ आपणास मिळविता येणे शक्य नाही आणि मिळाला तरी पचन होणे शक्य नाही, तो पदार्थ अधाशीपणाने खाऊन जाणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे होय.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.