धीट कुत्रा

धीट कुत्रा, इसापनीती कथा - [Dhit Kutra, Isapniti Katha] भित्रेपणा पुष्कळ वेळा संकटास कारण होतो.
धीट कुत्रा - इसापनीती कथा | Dhit Kutra - Isapniti Katha
एक कुत्रा एका गावातून चालला असता, त्या गावातील पाचपंचवीस कुत्रे मोठमोठयाने भुंकत त्याच्या मागे लागले.

तो कुत्रा पळता पळता दमला. मग त्याने आपल्या मनात विचार केला की ‘पळून जाता येणे आपणास शक्य नाही व कुत्र्याच्या तावडीतून सुटण्यास काही उपाय नाही’, तेव्हा आता काय होईल ते होवो, आपणच यांजवर तुटून पडावे हे चांगले.

असा विचार करून तो उलटला आणि आपला पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांवर मोठयाने गुरगुरत तुटून पडला. ते त्याचे धैर्य पाहून त्या कुत्र्यांची अगदी गाळण उडाली व हळूहळू ते सगळे पळून गेले.

तात्पर्य: भित्रेपणा पुष्कळ वेळा संकटास कारण होतो.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.