एका स्त्रीचा नवरा फार दारुबाज होता. त्यास ताळ्यावर आणण्यासाठी तिने पुष्कळ उपाय केले, परंतु काही उपयोग झाला नाही. मग एके रात्री तो दारू पिऊन बेशुद्ध पडला असता तिने त्यास स्मशानात नेऊन एका खड्डयात ठेवले व आपण भुताचे सोंग घेऊन तो शुद्धीवर येण्याची वाट पाहात बसली.
त्याची निशा उतरल्यावर तो इकडेतिकडे पाहू लागला तेव्हा त्याजपुढे काही खाण्याचा पदार्थ ठेवून, भुतासारखा आवाज काढून ती त्यास म्हणाली, ‘ऊठ आणि हा पदार्थ खा. मेलेल्या लोकांस अन्न देण्याचे काम मी करीत असतो.’ हे ऐकून नवरा म्हणाला, ‘माझ्या स्वभावाची तुला चांगली ओळख झालेली दिसत नाही, कारण तसे असते तर, तू मला हे अन्न न देता पिण्यास थोडीशी दारू दिली असतीस!’
तात्पर्य: व्यसनी मनुष्याचे व्यसन सुटणे फार दुरापास्त आहे.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा