चाकावरील माशी

चाकावरील माशी, इसापनीती कथा - [Chakawaril Mashi, Isapniti Katha] दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेऊन, त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची पुष्कळ मूर्ख लोकांस सवय असते.
चाकावरील माशी - इसापनीती कथा | Chakawaril Mashi - Isapniti Katha
एका घोडयाची गाडी भरधाव चालली होती, तिच्या चाकावर बसून एक माशी आपल्याशीच म्हणते, ‘किती धूळ उडवते आहे ही!’.

काही वेळाने ती माशी घोडयाच्या पाठीस एक जखम झाली होती त्यावर बसून पुन्हा आपल्याशीच म्हणते, ‘घोडयास पळावयास लावणारे माझ्यासारखे दुसरे कोण आहे?’

तात्पर्य: दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेऊन, त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची पुष्कळ मूर्ख लोकांस सवय असते.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.