स्टार प्रवाह च्या नकळत सारे घडले मध्ये नवा ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेत आलाय नवा ट्विस्ट. रांगडे पाटील कुटुंबावर संकटांची मालिका अखंड सुरुच आहे. एकीकडे मेधाची कटकारस्थानं संपतात न संपतात तोच आता सर्वांच्या लाडक्या परीचा जीव धोक्यात आलाय.निरागस हास्य आणि बडबड्या स्वभावाने प्रत्येकालाच लळा लावणारी परी मृत्यूशी झुंज देतेय. परीच्या या अवस्थेला कारणीभूत आहे खुद्द नेहा. परीला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवणाऱ्या, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नेहाकडून एक अक्षम्य चूक झालीय.
परीच्या आजारपणात नेहाने तिच्यावर चुकीचे औषधोपचार केलेत. नेहाकडून झालेल्या या चुकीची शिक्षा निष्पाप परीला भोगावी लागणार आहे. डॉक्टर परीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळेल का? परीचा जीव वाचेल का? या कठीण प्रसंगाचा सामना नेहा कशी करणार? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा ‘नकळत सारे घडले’च्या महाएपिसोडमध्ये होणार आहे.
त्यासाठी पाहायला विसरु नका ‘नकळत सारे घडले’चा महाएपिसोड रविवार ७ ऑक्टोबरला दुपारी २ आणि रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.