इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ ऑक्टोबर चे दिनविशेष
TEXT - TEXT.
शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२१
जागतिक दिवस
३ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जर्मन एकता दिन: जर्मनी.
ठळक घटना / घडामोडी
३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८६३: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थँक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला
- १९२९: सर्बिया क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउन युगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
- १९३२: इराकला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९४२: जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण. हे क्षेपणास्त्र म्हणजे अंतराळात पोचलेली सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
- १९८५: स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली.
- २००३: लास व्हेगास येथे नाट्यमंचावर वाघ व सिंहांकडून खेळ करवून घेणार्या सिगफ्रीड आणि रॉय या जोडींपैकी रॉय हॉर्नवर एका वाघाने प्रेक्षकांसमोरच घातकी हल्ला चढवला. हॉर्न जेमतेम वाचला पण त्यांचा खेळ बंद करण्यात आला.
जन्म / वाढदिवस / जयंती
३ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९११: सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३: नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
- १९८४: ऍशली सिम्पसन, अमेरिकन गायिका.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२२९: संत फ्रांसिस.
- १९२९: गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
- २०२०: पुष्पा अनंत भावे (लेखिका, स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, जन्म: २६ मार्च १९३९).
- २०२१: घनश्याम नायक (चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते, तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नटवरलाल प्रभाशंकर उंधायवाला उर्फ नट्टू काकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध, जन्म: १२ मे १९४५)
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |