स्टार प्रवाहच्या छत्रीवाली मालिकेत येणार रोमँटिक वळण
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं”- मंगेश पाडगांवकर
छत्रीवाली अर्थात मधुराच्या आयुष्यातही प्रेमाची चाहूल लागलीय. विक्रमने आपल्या प्रेमाची कबुली मधुरासमोर दिलीय खरी पण आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या होकाराची.
मधुरा विक्रमच्या प्रेमाचा स्वीकार करणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. पण मधुराच्या प्रेमाचा तिची आई स्वीकार करणार का? हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कारण मधुराच्या आईला हवाय मधुराची काळजी घेणारा आणि मनाने श्रीमंत असणारा जावई.
विक्रमचा स्वभाव याच्या नेमका उलट आहे. त्यामुळे मधुरासोबतच विक्रमला मधुराच्या आईचंही मन जिंकावं लागणार आहे.
आता मधुरासाठी विक्रम स्वत:ला बदलणार?
की मधुरासाठी आईला आपला निर्णय बदलावा लागणार?
अशी धमाकेदार गोष्ट ‘छत्रीवाली’च्या पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा ‘छत्रीवाली’ सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.