जय माये तुळशी - तुळशीची आरती

जय माये तुळशी, तुळशीची आरती - [Jai Maye Tulashi, Tulashichi Aarti] जय देवी जय देवी जय माये तुळशी, निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी.
जय माये तुळशी - तुळशीची आरती | Jai Maye Tulashi - Tulashichi Aarti

जय देवी जय देवी जय माये तुळशी, निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ ध्रु० ॥

ब्रह्मा केवळ मूळी मध्यें तो शौरी ।
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी ॥
सेवा करिती भावे सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी ॥ जय देवी जय० ॥ १ ॥

शीतल छाया भूतलव्यापक तू कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ॥
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी० ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकाली जो हे उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी ॥ जय देवी जय० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.