जन्मता पांडुरंगे, जिव्हेवरी लिहिले, अभंग शतकोटी, प्रमाण कवित्व रचिले
जन्मता पांडुरंगे ॥जिव्हेवरी लिहिले ॥
अभंग शतकोटी ॥
प्रमाण कवित्व रचिले ॥ १ ॥
जय जयाजी भक्तराया ॥
जिवलग नामया ॥
आरती ओवाळिता ॥
चित्त पालटे काया ॥ ध्रु० ॥
घ्यावया भक्तिसुख ॥
पांडुरंगे अवतार ॥
धरूनिया तीर्थमिषे ॥
केला जगाचा उद्धार ॥ जय० ॥ २ ॥
प्रत्यक्ष प्रचीती हे ॥
वाळवंट परिस केली ॥
हारपली विषमता ॥
द्वैतबुद्धी निरसली ॥ जय० ॥ ३ ॥
समाधि महाद्वारी ॥
श्रीविठ्ठलचरणी ॥
आरती ओवाळितो ॥
परिसा कर जोडूनी ॥ जय जयाजी० ॥ ४ ॥