Loading ...

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच - पाककृती (स्वाती खंदारे)

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविचची पाककृती - खमंग, कुरकुरीत न्याहारी मोठ्यांसोबतच बालगोपाळांना सुद्धा आवडेल असा पदार्थ (Sweet Corn Upma Sandwich Recipe).

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच - पाककृती (स्वाती खंदारे)

मधल्या वेळेत पोटभर न्याहारीत खाण्यासाठी खमंग आणि पौष्टीक ‘स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच’ मोठ्यांसोबतच बालगोपाळांना देखिल आवडेल असा पदार्थ...

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच करण्यासाठी लागणारा जिन्नस

(जिन्नस साधारण ७ ते ८ सॅंडविचसाठी)
  • २५० ग्रॅम मक्याचे दाणे (१ स्वीट कॉर्न)
  • एक चमचा आले - लसुन पेस्ट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीपुरती साखर
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा तिखट
  • १ चमचा गरम मसाला
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • कडीपत्त्याची पाने
  • मोहरी
  • हिंग
  • बटर
  • सॅंडविच ब्रेड

स्वीट कॉर्न उपमा करण्याची पाककृती


  • स्वीट कॉर्न स्वच्छ धूवून मिक्सरमधून जाडसर दळून घ्या.
  • गॅसवर भांडे गरम करत ठेवा, भांडे गरम झाल्यावर २ चमचे तेल टाका.
  • तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका.
  • मोहरी तडतडली की कडीपत्त्याची पाने, हिंग टाका नंतर आले-लसून पेस्ट टाकून परता.
  • भांड्यातील मिश्रण लालसर झाले की त्यात जाडसर दळलेले स्वीट कॉर्नचे दाने टाकून पुन्हा परता.
  • त्यावर हळद, तिखट, गरम मसाला, चवीनुसार मिठ व किंचीतशी साखर टाकून व्यवस्थित एकजीव करून परतून घ्या.
  • थोडेसे पाणी टाकून पून्हा परता व गॅस बंद करून १ ते २ मिनीटे झाकून ठेवा.
  • ‘स्वीट कॉर्न उमपा’ तयार आहे.

स्वीट कॉर्न सॅंडविच करण्याची पाककृती


  • उपमा ५ ते १० मिनीटे निवल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा व परतून घ्या.
  • आता सॅंडवीच ब्रेड घेऊन त्याच्या एका बाजूला ‘स्वीट कॉर्न उमपा’ लावून घ्या, त्यावर दुसरा सॅंडवीच ब्रेड ठेवून किंचीत दाबा.
  • फ्राय गॅस चालू करून त्यावर फ्राय पॅन ठेवा.
  • पॅन गरम झाल्यावर थोडे बटर लावून उपमा लावलेले सॅंडवीच ब्रेड दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • छान भाजल्यावर गरमा-गरम, कुरकुरीत ‘स्विटकॉर्न सॅंडवीच’ टोमॅटो सॉस किंवा आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची