थंडीच्या दिवसात, एक गाढवास असे वाटेल की, उघडी हवा आणि वाळलेला कडवा यांच्या ऐवजी थोडीशी उष्णता आणि घासभर ताजे गवत आपणास मिळेल तर फार चांगले होईल.
ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली परंतु त्याबरोबरच त्याचे कामही वाढले व त्यामुळे त्याला हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्याचाही कंटाळ येऊ लागला. आता पावसाळा येईल तर चांगले, असे त्याला वाटू लागले.
लवकरच पावसाळा आला व पुढे येणाऱ्या हिवाळ्यासाठी लागणारे सामान वाहून नेण्याचे श्रम त्याला पडू लागले. शेवटी, आता हिवाळा येईल तर चांगला असे त्याला वाटू लागले !
तात्पर्य: अतृप्त मनुष्याचे समाधान क्वचितच होते.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा