८ सप्टेंबर दिनविशेष

८ सप्टेंबर दिनविशेष - [8 September in History] दिनांक ८ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
८ सप्टेंबर दिनविशेष | 8 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ८ सप्टेंबर चे दिनविशेष


आशा भोसले - (८ सप्टेंबर १९३३) लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.


शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
८ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस


ठळक घटना / घडामोडी
८ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७२७: इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये कचकड्याच्या खेळ चालू असताना लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ७८ ठार.
 • १८३१: विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी.
 • १९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
 • १९१४: पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
 • १९२६: जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
 • १९३४: एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
 • १९४५: शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
 • १९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
 • १९६६: स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
 • १९७०: पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या तीन अमेरिकन विमानांचा नाश.
 • १९७४: वॉटरगेट कुंभांड - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्डने रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
 • १९९१: मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
 • १९९४: युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले.
 • २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
 • २००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

जन्म / वाढदिवस / जयंती
८ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११५७: रिचर्ड पहिले (इंग्लंडचे राजे, मृत्यू: ६ एप्रिल ११९९).
 • १६३३: फर्डिनांड चौथे (हंगेरीचे राजे, मृत्यू: ९ जुलै १६५४).
 • १८३०: फ्रेडरिक मिस्त्राल (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी, मृत्यू: २५ मार्च १९१४).
 • १८४६: पॉल चेटर (भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी, मृत्यू: २७ मे १९२६).
 • १८४८: व्हिक्टर मेयर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७).
 • १८५७: जॉर्ज मायकेलिस (जर्मनीचे चान्सेलर, मृत्यू: २४ जुलै १९३६).
 • १८८७: स्वामी शिवानंद सरस्वती (योगी व आध्यात्मिक गुरू, मृत्यू: १४ जुलै १९६३).
 • १९०१: हेन्ड्रिक व्हेरवोर्ड (दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान, जन्म: ६ सप्टेंबर १९६६).
 • १९१८: डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: १६ मार्च, १९९८).
 • १९२५: पीटर सेलर्स (इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक, मृत्यू: २४ जुलै १९८०).
 • १९२६: भूपेन हजारिका (संगीतकार व गायक, मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११).
 • १९३३: आशा भोसले (भारतीय पार्श्वगायिका).
 • १९४४: टेरी जेनर (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २५ मे २०११).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
८ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ७०१: सर्जियस पहिले (पोप, जन्म: ६५०).
 • ७८०: लिओ चौथे (बायझेन्टाईन सम्राट, जन्म: २५ जानेवारी ७५०).
 • १९६५: हेर्मान स्टॉडिंगर (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: २३ मार्च १८८१).
 • १९८०: विल्लर्ड लिब्बी (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: (१७ डिसेंबर १९०८).
 • १९८१: हिदेकी युकावा (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २३ जानेवारी १९०७).
 • १९८१: निसर्गदत्त महाराज (अद्वैत तत्त्वज्ञानी, जन्म: १७ एप्रिल १८९७).
 • १९८२: शेख अब्दुल्ला (जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते, जन्म: ५ डिसेंबर १९०५).
 • १९९१: वामन रामराव तथा वा. रा. कांत (कवी, जन्म: ६ ऑक्टोबर १९१३).
 • २०१०: मुरली (कन्नड व तामिळ अभिनेता, जन्म: १९ मे १९६४).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.