इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० सप्टेंबर चे दिनविशेष
TEXT - TEXT
शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२१
जागतिक दिवस
२० सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्रीय युवक दिन: थायलंड
ठळक घटना / घडामोडी
२० सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.
- १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
- १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
- १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
- १९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.
- १९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९९०: दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
- २००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.
- २००४: एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२० सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८९७: नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर (मराठी पत्रकार, मृत्यू: ८ जानेवारी १९७३).
- १९२१: पनानमल पंजाबी (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ?).
- १९२२: द. न. गोखले (चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक, मृत्यू: ?).
- १९३४: सोफिया लॉरेन (इटालियन अभिनेत्री).
- १९४४: रमेश सक्सेना (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १६ ऑगस्ट २०११).
- १९४९: महेश भट्ट (चित्रपट दिग्दर्शक).
- १९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर (गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री, मृत्यू: १० जून १९०६).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२० सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८१०: मीर तकी मीर (ऊर्दू शायर, जन्म: १७२३).
- १८५४: नारायण गुरु (केरळमधील समाजसुधारक, जन्म: २० ऑगस्ट १८५६).
- १९१५: गुलाबराव महाराज (विदर्भातील सतपुरुष, जन्म: ६ जुलै १८८१).
- १९३३: अॅनी बेझंट (विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक, जन्म: १ ऑक्टोबर १८४७).
- १९७९: लुडविक स्वोबोदा (चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २५ नोव्हेंबर १८९५).
- १९९६: दया पवार (मराठी साहित्यिक, जन्म: १९३५).
- १९९७: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार (चित्रपट अभिनेते, मृत्यू: ९ जानेवारी १९२६).
- २०१५: जगमोहन दालमिया (भारतीय उद्योजक, जन्म: ३० मे १९४०).
दिनविशेष सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |