७ सप्टेंबर दिनविशेष

७ सप्टेंबर दिनविशेष - [7 September in History] दिनांक ७ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
७ सप्टेंबर दिनविशेष | 7 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ सप्टेंबर चे दिनविशेष


इला रमेश भट - (७ सप्टेंबर १९३३) भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.


शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
७ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: ब्राझिल.
 • विजय दिन: मोझाम्बिक.

ठळक घटना / घडामोडी
५ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११९१: तिसरी क्रुसेड- इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.
 • १६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
 • १८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
 • १८२१: ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
 • १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
 • १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
 • १९२९: फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
 • १९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
 • १९४३: ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
 • १९४३: दुसरे महायुद्ध- जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
 • १९५३: निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
 • १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
 • १९७९: क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
 • १९९८: लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
 • १९९९: अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
 • २००४: हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
 • २००५: इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

जन्म / वाढदिवस / जयंती
७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५३३: एलिझाबेथ पहिल्या (इंग्लंडच्या राणी, मृत्यु: २४ मार्च १६०३).
 • १७९१: उमाजी नाईक (आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक, मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२).
 • १८०७: हेन्री सिवेल (न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: १४ मे १८७९).
 • १८२२: रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड (प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी, मृत्यू: ३१ मे १८७४).
 • १८३६: हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, मृत्यु: २२ एप्रिल, १९०८).
 • १८४९: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७).
 • १८५७: जॉन मॅकइलरेथ (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ५ जुलै १९३८).
 • १८९४: व्हिक रिचर्डसन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ३० ऑक्टोबर १९६९).
 • १९१२: डेव्हिड पॅकार्ड (ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक, मृत्यू: २६ मार्च १९९६).
 • १९१५: डॉ. महेश्वर नियोग (प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री, मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५).
 • १९२५: भानुमती रामकृष्ण (तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, मृत्यू: २४ डिसेंबर २००५).
 • १९३३: इला भट्ट (असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या).
 • १९३४: सुनील गंगोपाध्याय (बंगाली कवी व कादंबरीकार, मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२).
 • १९३४: बी. आर. इशारा (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यू: २५ जुलै २०१२).
 • १९३६: बडी हॉली (अमेरिकन गायक, संगीतकार, मृत्यु: ३ फेब्रुवारी १९५९).
 • १९४०: चंद्रकांत खोत (लेखक व संपादक, मृत्यु: १० डिसेंबर २०१४).
 • १९५५: अझहर खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू).
 • १९६४: नुरुल आबेदिन (बांगलादेशी क्रिकेट खेळाडू).
 • १९६७: स्टीव जेम्स (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९६७: आलोक शर्मा (भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी).
 • १९८४: फरवीझ महरूफ (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
७ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३१२: फर्डिनांड चौथे (कॅस्टिलचे राजे, जन्म: ६ डिसेंबर १३१२).
 • १६०१: जॉन शेक्सपियर (विल्यम शेक्सपियर यांचे वडील, जन्म: १५३१).
 • १८०९: बुद्ध योद्फा चुलालोक (थायलंडचे राजे, जन्म: २० मार्च १७३७).
 • १९५३: भगवान रघुनाथ कुळकर्णी (मराठी कवी, लेखक, जन्म: १५ ऑगस्ट १९१३).
 • १९७९: जे. जी. नवले (कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक, जन्म: ७ डिसेंबर १९०२).
 • १९९१: रवि नारायण रेड्डी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक, जन्म: ५ जून १९०८).
 • १९९४: टेरेन्स यंग (इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार, जन्म: २० जून १९१५).
 • १९९७: मुकूल आनंद (हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, जन्म: ११ ऑक्टोबर १९५१).
 • १९९७: मोबुटु सेसे सेको (झैरचे हुकुमशहा, जन्म: १४ ऑक्टोबर १९३०).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.