१८ सप्टेंबर दिनविशेष

१८ सप्टेंबर दिनविशेष - [18 September in History] दिनांक १८ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१८ सप्टेंबर दिनविशेष | 18 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ सप्टेंबर चे दिनविशेष


शिवाजी गोविंदराव सावंत / शिवाजी सावंत - (३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२) मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.


शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
१८ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • वरिष्ठ नागरिक आदर दिन: जपान.

ठळक घटना / घडामोडी
१८ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५०२: क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
 • १८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
 • १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
 • १८८५: माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.
 • १९१९: नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
 • १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.
 • १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.
 • १९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
 • १९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
 • १९४८: मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
 • १९६०: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.
 • १९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • १९८१: फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
 • १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.
 • १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
 • २००१: ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
 • २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 • २००७: पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.
 • २००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.
 • २०१६: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१८ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ५३: ट्राजान (रोमन सम्राट, मृत्यू: ९ ऑगस्ट ११७).
 • १७०९: सॅम्युएल जॉन्सन (इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक, मृत्यू: १३ डिसेंबर १७८४).
 • १९००: शिवसागर रामगुलाम (मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री, मृत्यू: १५ डिसेंबर १९८५).
 • १९०५: ग्रेटा गार्बो (हॉलीवूड अभिनेत्री, मृत्यू: १५ एप्रिल १९९०).
 • १९०६: प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी (हिंदी हास्यकवी, मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५).
 • १९१२: राजा नेने (चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५).
 • १९२३: ऍन (रोमेनियाची राणी, मृत्यू: १ ऑगस्ट २०१६).
 • १९४५: जॉन मॅकफी (मॅकफी चे संस्थापक, मृत्यू: २३ जून २०२१).
 • १९५०: विष्णुवर्धन (भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९).
 • १९५८: डेरेक प्रिंगल (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९६८: उपेंद्र राव (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी).
 • १९७१: लान्स आर्मस्ट्रॉंग (अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१८ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९७०: जिमी हेंड्रिक्स (अमेरिकन संगीतकार, जन्म: २७ नोव्हेंबर १९४२).
 • १९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह (भारताचे सहावे उपराष्ट्रपती, जन्म: १७ डिसेंबर १९०५).
 • १९९३: असित सेन (विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, जन्म: १३ मे १९१७).
 • १९९५: काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग (हिंदी कवी, जन्म: १८ सप्टेंबर १९०६).
 • १९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी (चित्रपट दिग्दर्शक, जन्म: ४ ऑक्टोबर १९३३).
 • २००२: शिवाजी सावंत (मराठी साहित्यिक, जन्म: ३१ ऑगस्ट १९४०).
 • २००४: डॉ. भालचंद्र दिनकर फडके (मराठी समीक्षक, साहित्यिक, जन्म: १३ मे १९२५).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.