इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ सप्टेंबर चे दिनविशेष
कृष्णराव साबळे / शाहीर साबळे - (३ सप्टेंबर १९२३ - २० मार्च २०१५) स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून योगदान. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते ओळखले जातात.
शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
३ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
३ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
- १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
- १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
- १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
- १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
३ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८५५: पंत महाराज बाळेकुंद्री (आध्यात्मिक गुरू, मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५).
- १८६९: फ्रित्झ प्रेगल (नोबेल पारितोषिक विजेते स्लोव्हेकियाचे रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: १३ डिसेंबर १९३०).
- १८७५: फर्डिनांड पोर्श (ऑस्ट्रियाचे कार-अभियंते, मृत्यु: ३० जानेवारी १९५१).
- १९०५: कार्ल डेव्हिड अँडरसन (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: ११ जानेवारी १९९१).
- १९२३: कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे (शाहीर, लोकनाट्यकार, मृत्यु: २० मार्च २०१५).
- १९२३: ग्लेन बेल (टाको बेल चे संस्थापक, मृत्यू: १६ जानेवारी २०१२).
- १९२३: किशन महाराज (प्रसिद्ध तबला वादक, मृत्यू: ४ मे २००८).
- १९२७: अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार (बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते, मृत्यू: २४ जुलै १९८०).
- १९३१: श्याम फडके (नाटककार).
- १९३८: रायोजी नोयोरी (नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ).
- १९४०: प्यारेलाल शर्मा (लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार).
- १९५६: जिझु दासगुप्ता (भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक, मृत्यू: २१ डिसेंबर २०१२).
- १९६५: चार्ली शीन (अमेरिकन अभिनेते).
- १९७१: किरण देसाई (भारतीय-अमेरिकन लेखक).
- १९७४: राहुल संघवी (भारतीय क्रिकेटपटू).
- १९७६: विवेक ओबेरॉय (हिंदी चित्रपट अभिनेते).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६५८: ऑलिव्हर क्रॉमवेल (इंग्लंडचे राज्यकर्ते, जन्म: २५ एप्रिल १५९९).
- १९४८: एडवर्ड बेनेस (चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २८ मे १८८४).
- १९५३: लक्ष्मणराव पर्वतकर तथा खाप्रुमामा (संगीतक्षेत्रातील कलावंत, प्रसिद्ध तबला वादक, जन्म: १८७९).
- १९६७: अनंत हरी गद्रे (मराठी समाजसुधारक, जन्म: १६ ऑक्टोबर १८९०).
- १९९१: फ्रँक काप्रा (अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, जन्म: १८ मे १८९७).
- २००५: विल्यम रेह्नक्विस्ट (अमेरिकेचे सर्वोच्च न्यायाधीश, जन्म: १ ऑक्टोबर १९२४).
दिनविशेष सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |