एन डी स्टुडिओत उत्सवाचे वातावरण

एन डी स्टुडिओत उत्सवाचे वातावरण - [Dahi, Handi Ganeshotsav at N D Studio Bollywood Theme Park Karjat] नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन डी स्टुडिओतील बॉलीवूड थीमपार्क मध्ये नुकताच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
एन डी स्टुडिओत उत्सवाचे वातावरण - बातम्या | Dahi, Handi Ganeshotsav at N D Studio Bollywood Theme Park Karjat - News

एन डी स्टुडिओच्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा

श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येत असलेल्या सणासुदीचे वेध सर्वत्र लागू झाले आहेत.

गोपाळकाला, गणपती अशा एका मागून एक येत असलेल्या विविध सणवारांदरम्यानचा लोकांमधला उत्साह काही औरच असतो.

त्यामुळे, याच उत्सवांच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन डी स्टुडिओतील ‘बॉलीवूड थीमपार्क’ मध्ये नुकताच ‘दहीहंडी’ आणि ‘गणेशोत्सव’ साजरा करण्यात आला.

कर्जत येथील ‘नितीन चंद्रकांत देसाई’ यांच्या ‘एन. डी. स्टुडीओत’ साकारण्यात आलेल्या या ‘बॉलीवूड मायानगरीत’, उभारण्यात आलेल्या छोटेखानी हंडीचा स्थानिक गोविंदांनी मनसोक्त आनंद लुटला.

इतकेच नव्हे तर, लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, एन. डी. स्टुडिओच्या आवारातील गणेशमूर्तीची पारंपारिक पूजा आणि महाआरती करण्यात आली.

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत पार पडलेल्या विघ्नहर्त्याच्या या महाआरतीत एन. डी. स्टुडीओतील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. एरव्ही बॉलीवूडच्या बहुरंगी जल्लोषाने नटलेले हे थीमपार्क अथर्वशिर्षने अध्यात्मिक रंगात न्हाऊन गेले होते.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.