४ सप्टेंबर दिनविशेष - [4 September in History] दिनांक ४ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ सप्टेंबर चे दिनविशेष
दादाभाई नौरोजी - (४ सप्टेंबर १८२५ - ३० जून १९१७) भारतीय राजकारणी असलेले दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले होते.
शेवटचा बदल १ सप्टेंबर २०२१
जागतिक दिवस
४ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
४ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
- १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
- १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
- १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
- १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
- १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
- २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
- २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.
जन्म / वाढदिवस / जयंती
४ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८२५: दादाभाई नौरोजी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह, मृत्यू: ३० जून १९१७).
- १९०१: विल्यम लियन्स जॅग्वोर (जॅग्वोर कार चे सहसंस्थापक , मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५).
- १९०५: वॉल्टर झाप (मिनॉक्स चे शोधक, मृत्यू: १७ जुलै २००३).
- १९१३: पी. एन. हक्सर (प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८).
- १९२३: राम किशोर शुक्ला (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: ११ डिसेंबर २००३).
- १९३७: शंकर सारडा (साहित्यिक व समीक्षक, मृत्यू: २८ जानेवारी २०२१).
- १९४१: सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री).
- १९५२: ऋषी कपूर (भारतीय चित्रपट अभिनेते, मृत्यु: ३० एप्रिल २०२०).
- १९६२: किरण मोरे (भारतीय यष्टीरक्षक).
- १९६४: आदेश श्रीवास्तव (भारतीय गायक-गीतकार, मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५).
- १९७१: लान्स क्लूसनर (दक्षिण अफ्रिकेचे अष्टपैलू क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
४ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९९७: डॉ. धर्मवीर भारती (हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, जन्म: २५ डिसेंबर १९२६).
- २०००: मोहम्मद उमर मुक्री (खळाळून हसवणारे विनोदी कलाकार, जन्म: ५ जानेवारी १९२२).
- २०१२: सय्यद मुस्तफा सिराज (भारतीय लेखक, जन्म: १३ ऑक्टोबर १९३०).
- २०१२: हांक सूफी (भारतीय गायक-गीतकार, जन्म: ३ मार्च १९५२).
- २०१५: विल्फ्रेड डी डिसोझा (भारतीय सर्जन आणि राजकारणी, जन्म: २३ एप्रिल १९२७).
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / सप्टेंबर दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर