तुझं माझं नातं
साऱ्या नात्यां पलिकडचं अलिकडचंच अगदी
तरी पलिकडचं
नात्यांच्या गुंत्यात
गुरफटलेल्यांना
भरकटलेल्यांना नाही समजायचं
तुझं माझं नातं
खरं तर...
कुणाचं काय जातं
जरी तू... ती...
आणि मी... तो..
तरी तोता तोती सारखं
रटत नाही बसतं
आपण जगणं
भगंणं... रडणं...
पुन्हा जुडणं...
नक्किच
चाकोरी बाहेरिल
तुझं माझं नातं
अपेक्षां पलिकडील
त्या विश्वात... जिथे
फक्त आहे विश्वास
श्वास असण्याचा
एक दुसऱ्यासाठी
बनुन काठी आपण
आधार शोधुया
एक दुसऱ्यासाठी
तुझं हरवलेलं
माझं हिरावलेलं
विश्व शोधु आपण
आपल्यासाठी
- अमोल सराफ
साऱ्या नात्यां पलिकडचं अलिकडचंच अगदी
तरी पलिकडचं
नात्यांच्या गुंत्यात
गुरफटलेल्यांना
भरकटलेल्यांना नाही समजायचं
तुझं माझं नातं
खरं तर...
कुणाचं काय जातं
जरी तू... ती...
आणि मी... तो..
तरी तोता तोती सारखं
रटत नाही बसतं
आपण जगणं
भगंणं... रडणं...
पुन्हा जुडणं...
नक्किच
चाकोरी बाहेरिल
तुझं माझं नातं
अपेक्षां पलिकडील
त्या विश्वात... जिथे
फक्त आहे विश्वास
श्वास असण्याचा
एक दुसऱ्यासाठी
बनुन काठी आपण
आधार शोधुया
एक दुसऱ्यासाठी
तुझं हरवलेलं
माझं हिरावलेलं
विश्व शोधु आपण
आपल्यासाठी
- अमोल सराफ