Loading ...
/* Dont copy */

शुभ लग्न सावधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर

शुभ लग्न सावधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर, मराठी चित्रपट - [Shubh Lagna Savdhan Marathi Cinema Trailer, Marathi Movie].

शुभ लग्न सावधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर - मराठी चित्रपट | Shubh Lagna Savdhan Marathi Cinema Trailer - Marathi Movie

उत्सवाप्रमाणे साजरा होणाऱ्या लग्नसोहळ्यावर आधारित शुभ लग्न सावधान सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे

लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पल्लवी विनय जोशी’ निर्मित आणि ‘समीर रमेश सुर्वे’ दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच मंगलमय वातावरणात ट्रेलर लाँच करण्यात आला. दादर येथील नक्षत्र मॉलमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार ट्रेलर सोहळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला. मराठमोळ्या लग्नसमारंभाचा माहौल तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, हजर राहिलेल्या प्रत्येकांचा विशेष पाहुणचारदेखील यादरम्यान करण्यात आला.

शृती मराठे, सुबोध भावे, रेवती लिमये, प्रतिक देशमुख, शिल्पा गांधी, डॉ. अभय कामत, समिर सुर्वे, प्राची निल आणि सतिष सलागरे
शृती मराठे, सुबोध भावे, रेवती लिमये, प्रतिक देशमुख, शिल्पा गांधी, डॉ. अभय कामत, समिर सुर्वे, प्राची निल आणि सतिष सलागरे

लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची रेलचेल या चित्रपटात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ‘सुबोध भावे’ आणि ‘श्रुती मराठे’ यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर ‘लग्न’ या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय, ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच, लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच, हा ट्रेलर पाहताना, ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

टिम शुभ लग्न सावधान
टिम शुभ लग्न सावधान

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे. तसेच या सिनेमास तृप्ती पुराणिक व त्यांच्या स्टुडियो एलिमेंटस्ने निर्मिती सहाय्य केले आहे. सहनिर्मात्यांची धुरा अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सांभाळली आहे. नवरात्रीच्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला जाण्यास प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर झाले असतील, हे निश्चीत !

शुभ लग्न सावधान मराठी चित्रपटाचा ट्रेलर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची