कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी

कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी, मराठी टिव्ही - [Kashi Honar Pundalikachi Wari, Marathi TV].
कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी - मराठी टिव्ही | Kashi Honar Pundalikachi Wari - Marathi TV

वारी विठ्ठलाची मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा भक्तीमय प्रवास

नजरेत दया, हृदयात माया
कटेवरी हात विठ्ठलाचे

चिपळीचा नाद, मृदुंगाचा ताल
वारकरी नाचती पंढरीचे

सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कारच म्हणावा लागेल. दरवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. विठूनामाचा गजर करत तल्लीन होऊन वैष्णव पायी पंढरपूरला जातात. वारीच्या या संपूर्ण प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे. पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. वारीची ही प्रथा पुंडलिकानेच सुरु केली.

पण त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर पुंडलिकाने कशी मात केली? त्याची वारी पूर्ण झाली का? पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला सहाय्य केलं का? या रोमहर्षक प्रवासाची गोष्ट ‘स्टार प्रवाह’च्या ‘वारी विठ्ठलाची’ या महामुव्हीमधून उलगडणार आहे.

कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी
कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी

त्याचप्रमाणे पुंडलिकाची वारी का सुरु झाली? डोक्यावर तुळस का घेतली जाते? गंधाचा टिळा का लावला जातो? रिंगणाचे खेळ का खेळतात? अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत.

तेव्हा विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती घ्यायची असेल तर पाहायला विसरु नका ‘वारी विठ्ठलाची’ रविवार २३ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त ‘स्टार प्रवाहवर’.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.