२० नोव्हेंबर दिनविशेष - [November 20 in History] दिनांक २० नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

दिनांक २० नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
प्रबोधनकार ठाकरे - (१७ सप्टेंबर १८८५ - २० नोव्हेंबर १९७३) केशव सीताराम ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते.
शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०२२
जागतिक दिवस
२० नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- लोकशिक्षण दिवस.
- बालक हक्क दिवस.
ठळक घटना / घडामोडी
२० नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९१०: मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
- १९१७: पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
- १९१७: युक्रेन प्रजासत्ताक झाले.
- १९२३: जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
- १९४०: दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
- १९४३: दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
- १९४७: दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
- १९४७: युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
- १९६९: व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
- १९७९: सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
- १९८४: सेटीची स्थापना.
- १९८५: मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
- १९९३: एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
- १९९४: अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
- १९९८: अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
- १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
- २००३: इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२० नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- २७०: रोमन सम्राट मॅक्सिमिनस
- १७५०: टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा.
- १६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक
- १६२५: डच चित्रकार पॉलस पोर्टर
- १७६१: पोप आठवा पायस.
- १७६५: इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल
- १८४१: कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये
- १८५१: इटलीची राणी मार्घेरिता
- १८५४: मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे
- १८५८: सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
- १८६४: एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
- १८८९: एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
- १८९६: येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
- १९१०: विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२४: रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४१: हसीना मोइन, उर्दू लेखक.
- १९४२: ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४८: जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
- १९६३: इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स
- १९६९: शिल्पा शिरोडकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२० नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१०: रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय
- १९७३: केशव सीताराम ठाकरे, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी
- १९८९: हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / नोव्हेंबर दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय