इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ११ नोव्हेंबर चे दिनविशेष
TEXT - TEXT.
शेवटचा बदल ९ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
११ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: पोलंड, ॲंगोला.
- शस्त्रसंधी दिन: फ्रांस, बेल्जियम.
- सैनिक दिन: अमेरिका.
- स्मृती दिन: युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
ठळक घटना / घडामोडी
११ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९१८: पहिले महायुद्ध: जर्मनीने फ्रांसमधील कॉम्पियेन्ये गावाजवळ दोस्त राष्ट्रांशी संधी केली व युद्ध संपुष्टात आणले.
- १९१८: ऑस्ट्रियाच्या सम्राट चार्ल्स पहिल्याने पदत्याग केला.
- १९२१: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वॉरेन जी. हार्डिंगने वॉशिंग्टन डी.सीमधील अज्ञात सैनिकाची समाधी राष्ट्राला अर्पण केली.
- १९३३: अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यात प्रचंड वादळाने जमिनीवरील माती उडून गेली. डस्ट बोलची ही सुरूवात होती. यानंतर अमेरिकेतील महाभयंकर दुष्काळास सुरुवात झाली.
- १९६२: कुवैतने नवीन संविधान अंगिकारले.
- १९६५: र्होडेशियाच्या (आताचे झिम्बाब्वे) श्वेतवर्णीय लघुमतीतील सरकारने राष्ट्राला स्वतंत्र जाहीर केले.
- १९६८: मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.
- १९९२: चर्च ऑफ इंग्लंडने स्त्रीयांना पादरी होण्याची मुभा दिली.
जन्म / वाढदिवस / जयंती
११ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १०५०: हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- १९२४: रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४: कॅलिस्टा फ्लॉकहार्ट, अमेरिकन अभिनेत्री.
- १९६९: मायकेल ओवेन्स, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४: लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
११ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८८०: नेड केली, ऑस्ट्रेलियन दरोडेखोर.
- १९१८: जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी.
- २००४: यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी.
११ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |