इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ नोव्हेंबर चे दिनविशेष
इंदिरा गांधी - (१९ नोव्हेंबर १९१७ - ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
१९ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- नागरिक दिन.
ठळक घटना / घडामोडी
१९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १४९३: क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
- १८६३: अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.
- १९४१: दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
- १९४२: स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
- १९४३: ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
- १९४६: अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
- १९६९: अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
- १९७७: त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
- १९७९: इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
- १९८४: मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
- १९९८: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
- १९९८: फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
- १९९९: चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
जन्म / वाढदिवस / जयंती
१९ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८२८: मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
- १८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक.
- १९१७: इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
- १९५१: झीनत अमान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७५: सुष्मिता सेन, ‘मिस युनिव्हर्स’ आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१९ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९३१: शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
१९ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |