३० नोव्हेंबर दिनविशेष

३० नोव्हेंबर दिनविशेष - [30 November in History] दिनांक ३० नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३० नोव्हेंबर दिनविशेष | 30 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० नोव्हेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
३० नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • बार्बाडोस: स्वातंत्र्य दिन.

ठळक घटना / घडामोडी
३० नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७८२: अमेरिकन क्रांती - पॅरिसमध्ये अमेरिका व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
 • १८०३: न्यू ऑर्लिअन्स येथे स्पेनच्या प्रतिनिधीने लुईझियाना प्रांत फ्रांसच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला. २० दिवसांनी फ्रांसने हा प्रांत यू.एस.ला लुईझियाना परचेसचा हिस्सा महणून विकला.
 • १८५३: क्रिमीअन युद्ध - सिनोपच्या लढाईत रशियाच्या नौदलाने ऑट्टोमन जहाजांचा तांडा बुडविला.
 • १८७२: पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
 • १९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
 • १९३९: रशियाच्या सैन्याने फिनलंडवर चढाई करून मॅनरहाइम रेषेपर्यंत धडक मारली.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हियेत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.
 • १९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
 • १९६६: बार्बाडोसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९६६: दक्षिण यमनच्या प्रजासत्ताकला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
 • १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
 • १९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
 • २०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
 • २००४: लायन एर फ्लाइट ५३८ हे विमान इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सुरकर्ता गावाजवळ कोसळले. २६ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
३० नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६०२: ऑटो व्हॉन गॅरिक (जर्मन पदार्थवैज्ञानिक, मृत्यू: ३० नोव्हेंबर २०२१).
 • १७६१: स्मिथसन टेनांट (हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५).
 • १८३५: मार्क ट्वेन (विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार, मृत्यू: २१ एप्रिल १९१०).
 • १८५८: डॉ. जगदीशचंद्र बोस (भारतीय वनस्पती शास्रज्ञ, मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७).
 • १८७४: सर विन्स्टन चर्चिल (ब्रिटनचे माजी पंतप्रधान, मृत्यू: २४ जानेवारी १९६५).
 • १९१०: बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर (गोमंतकीय कवी, मृत्यू: ९ जुलै १९८४).
 • १९३५: आनंद यादव (मराठी लेखक, मृत्यू: २७ नोव्हेंबर २०१६).
 • १९३६: ऍबी हॉफमन (युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक, मृत्यू: १२ एप्रिल १९८९).
 • १९४५: वाणी जयराम (पार्श्वगायिका).
 • १९६७: राजीव दिक्षीत, (सामाजिक कार्यकर्ता, मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३० नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९००: ऑस्कर वाईल्ड (सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार, जन्म: १६ ऑक्टोबर १८५४).
 • १९७०: निना रिकी (जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर, जन्म: १४ जानेवारी १८८३).
 • १९८९: अहमदिऊ आहिदो (कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष, जन्म: २४ ऑगस्ट १९२४).
 • १९९५: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे, (साहित्यिक, जन्म: १६ जुलै १९१४).
 • २०१०: राजीव दिक्षीत (सामाजिक कार्यकर्ता, जन्म: ३० नोव्हेंबर २०६७).
 • २०१२: इंद्रकुमार गुजराल (भारताचे १२ वे पंतप्रधान, जन्म: ४ डिसेंबर १९१९).
 • २०१४: जर्बोम गॅमलिन (अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री, जन्म: १६ एप्रिल १९६१).

३० नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.