१ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १ डिसेंबरचा इतिहास.

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १ डिसेंबरचा इतिहास पहा.
बा. सी. मर्ढेकर - (१ डिसेंबर १९०९ - २० मार्च १९५६) बाळ सीताराम मर्ढेकर मराठी नवकाव्याचे प्रणेते.
शेवटचा बदल १ डिसेंबर २०२३
जागतिक दिवस / दिनविशेष
१ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- भारताचा लोकशिक्षण दिवस
१ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)
१ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी- १६४०: पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
- १८२२: पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
- १८३५: हान्स क्रिस्चियन ॲंडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
- १९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
- १९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
- १९५८: मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३: नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले.
- १९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
- १९६५: भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
- १९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
- १९७४: टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
- १९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
- १९८१: युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
- १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
- १९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.
- १९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
- १९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
- १९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
- २०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
- २००१: ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.
- २०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १०८१: लुई (सहावा) (फ्रान्सचा राजा, मृत्यू: १ ऑगस्ट ११३७).
- १७६१: मेरी तूसाँ (मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका, मृत्यू: १६ एप्रिल १८५०).
- १८८५: आचार्य काका कालेलकर (साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक).
- १९०९: बाळ सीताराम मर्ढेकर / बा. सी. मर्ढेकर (मराठी नवकाव्याचे प्रणेते, मराठी कवी व लेखक, मृत्यू: २० मार्च १९५६).
- १९११: अनंत बाळकृष्ण अंतरकर (पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक, मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६).
- १९५०: मंजू बन्सल (भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक).
- १९५५: उदित नारायण (भारतीय पार्श्वगायक).
- १९६०: शिरिन एम. राय (भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक).
- १९६३: अर्जुन रणतुंगा (श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार).
- १९८०: मोहोम्मद कैफ (भारतीय क्रिकेटपटू).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ११३५: हेन्री पहिला (इंग्लंडचा राजा, जन्म: १०६८).
- १८६६: सर जॉर्ज एव्हरेस्ट (भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल, जन्म: ४ जुलै १७९०).
- १९७३: डेव्हिड बेन गुरियन (इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान, जन्म: १६ ऑक्टोबर १८८६).
- १९८५: शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी (स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक, जन्म: १८ जून १८९९).
- १९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार (मराठी लेखक, जन्म: २ ऑक्टोबर १९०८).
- १९९०: विजयालक्ष्मी पंडीत (राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी, जन्म: १८ ऑगस्ट १९००).
१ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:
डिसेंबर महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय