४ डिसेंबर दिनविशेष

४ डिसेंबर दिनविशेष - [4 December in History] दिनांक ४ डिसेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
४ डिसेंबर दिनविशेष | 4 December in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ डिसेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल २ डिसेंबर २०२१

जागतिक दिवस
४ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
४ डिसेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ७७१: कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रॅंकिश सम्राटपदी.
 • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
 • १८७२: ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
 • १९१८: पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
 • १९५२: लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
 • १९५४: मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
 • १९५८: डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
 • १९७१: भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
 • १९७१: भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
 • १९७१: अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
 • १९७७: मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
 • १९८४: चीनने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९८४: हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
 • १९९१: ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी ॲंडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.
 • २००८: कॅनडाची संसद बरखास्त.
 • १७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
 • १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
 • १९२४: गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
 • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
 • १९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
 • १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • १९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
 • १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
 • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म / वाढदिवस / जयंती
४ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८३५: सॅम्युअल बटलर (इंग्लिश लेखक, मृत्यू: १८ जून १९०२).
 • १८५२: ओरेस्ट ख्वोल्सन (रशियन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ११ मे १९३४).
 • १८६१: हंगेस हफस्टाइन (आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: १३ डिसेंबर १९२२).
 • १८९२: फ्रान्सिस्को फ्रँको (स्पेनचा हुकुमशहा, मृत्यू: २० नोव्हेंबर १९७५).
 • १९१०: आर. व्यंकटरमण (भारताचे माजी राष्ट्रपती, मृत्यू: २७ जानेवारी २००९).
 • १९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल (भारतीय अभिनेते, मृत्यू: १७ जून १९६५).
 • १९१६: बळवंत गार्गी (पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, मृत्यू: २२ एप्रिल २००३).
 • १९१९: इंद्रकुमार गुजराल (भारताचे माजी पंतप्रधान, मृत्यू: २९ नोव्हेंबर २०१२).
 • १९३२: रोह तै-वू (दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २६ ऑक्टोबर २०२१).
 • १९३५: शंकर काशिनाथ बोडस (पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक, मृत्यू: २० जुलै १९९५).
 • १९४३: फ्रान्सिस दिब्रिटो (मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर).
 • १९७७: अजित आगरकर (भारतीय क्रिकेटर).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
४ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८५०: विल्यम स्टर्जन (विद्युत मोटरचे शोधक, जन्म: २२ मे १७८३).
 • १९०२: चार्ल्स डो (डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक, जन्म: ६ नोव्हेंबर १८५१).
 • ११३१: ओमर खय्याम (पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी, जन्म: १८ मे १०४८).
 • १९७३: गिरीश तथा शंकर केशव कानेटकर (कवी, जन्म: २८ ऑक्टोबर १८९३).
 • १९७५: हाना आरेंट (जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक, जन्म: १४ ऑक्टोबर १९०६).
 • १९८१: ज. द. गोंधळेकर (मराठी चित्रकार, जन्म: २१ एप्रिल १९०९).
 • २०००: हेन्क अर्रोन (सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान, जन्म: २५ एप्रिल १९३६).
 • २०१४: व्ही. आर. कृष्ण अय्यर (भारतीय वकील आणि न्यायाधीश, जन्म: १५ नोव्हेंबर १९१५).

४ डिसेंबर दिनविशेषदिनविशेष        डिसेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #डिसेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.