Loading ...

माझी मराठी - मराठी लेख

माझी मराठी, मराठी लेख - [Majhi Marathi, Marathi Article] लहान वयात मराठी व जाणत्या वयात इंग्रजी शिकल्यामुळे आमच्या पिढीच्या दोन्ही भाषा चांगल्या झाल्या. मोठेमोठे लेखक त्यामुळे निर्माण झाले.

माझी मराठी - मराठी लेख | Majhi Marathi - Marathi Article

प्राथमिक शिक्षण ‘मराठी’ मातृभाषेतूनच असावं

प्राथमिक शिक्षण ‘मराठी’ मातृभाषेतूनच असावं असं माझं स्पष्ट मत आहे. प्राथमिक शाळेची मुलं दहा वर्षापर्यंतची असतात. पहिली पाच वर्ष तर शिशू म्हणून घरातच जातात. नतंरच्या पाच वर्षात मराठीतून शिक्षण असलं तर मुलांचं मराठी खूपच आकाराला येईल. पूर्वी आमचं शिक्षण मराठीतूनच झालं, नंतर पाचवी म्हणजे इंग्रजी पहिली म्हणत. अशी इंग्रजी सातवी म्हणजे मॅट्रिक म्हणत.

लहान वयात मराठी व जाणत्या वयात इंग्रजी शिकल्यामुळे आमच्या पिढीच्या दोन्ही भाषा चांगल्या झाल्या. मोठेमोठे लेखक त्यामुळे निर्माण झाले. उभ्या जगात त्यांच काही नडलं नाही. इंग्रजी भाषा मराठीच्या मानाने सोपी आहे. पहिली पासून इंग्रजी ठेवायचीच झाल्याच ऐच्छिक विषय म्हणून ठेवावी. त्यात कमी गुण मिळाले तरी प्रगतिपुस्तकावर फार परिणाम होऊ देऊ नये.

लांब, दूरवरच्या खेड्यापाड्यातून शिकणाऱ्या मुलांना आपली भाषा येणं हे जास्त महत्त्वाच आहे. त्यातल्या नापासाच प्रमाण वाढलं तर शाळेतली मुलांची हजेरी नक्कीच रोडवेल. वर्ग ओस पडतील. मात्र मराठीत शिक्षण दिल्यास निदान चौथीपर्यंत तरी दूर खेड्यापाड्यातील मुल-मुली आनंदाने शिकतील. तेवढं झालं त्यांना आपल्या आयुष्यात उभं राहायला निश्चित मदत करील आणि मुळात आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही हा न्यूनगंड मनातून काढूनच टाका. तुम्ही टी.व्ही वर रशियन, चिनी, इटालियन वगैरे खेळाडू आपल्या मातृभाषेतूनच बोलतात हे तर ऐकलचं असेल. तुम्ही तुमच्या मातृभाषेतूनच बोलायला हवं! म्हणजे आत्मविश्वासानं बोलता येईल.

आपला भारत आता स्वतंत्र, स्वाभिमानी देश आहे. आपल्या स्वातंत्र्याला त्रेपन्न वर्ष झालेली आहेत. तेव्हा एवढा तरी स्व-भाषाभिमान आपण मनोमन बाळगायला हवाच आहे! ते फार फार जरुरीच आहे, असं माझं स्पष्ट मत आहे!

तुम्ही तो मनोमनी बाळगाल तर:

मराठी असे आमुची मायबोली ।
जरी आज ती राजभाषा नसे ॥
नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।
यशाची पुढे दिव्य आशा असे ॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची