२५ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २५ एप्रिल चे दिनविशेष.

शाहू मोडक - (२५ एप्रिल १९१८ - ११ मे १९९३) हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असलेल्या शाहू मोडक यांनी अनेक धार्मिक व्यक्तीरेखा साकारलेल्या आहेत.
जागतिक दिवस
२५ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- ऍन्झाक दिन: ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
- क्रांती दिन: पोर्तुगाल.
- फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन): इटली.
- ध्वज दिन: फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.
- जागतिक मलेरिया दिन.
- डीएनए दिन.
ठळक घटना (घडामोडी)
२५ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १६०७: ८० वर्षांचे युद्ध - नेदरलॅंड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
- १७९२: क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
- १८२९: चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- १८४६: मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी.
- १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
- १८९८: अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९०१: अमेरिकेतील न्यू यॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
- १९१५: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
- १९२६: ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
- १९४५: दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
- १९४६: पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी दिल्याची घोषणा
- १९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
- १९६१: रॉबर्ट नॉईसला इंटिग्रेटेड सर्किटचे पेटंट मिळाले.
- १९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
- १९७२: पोलरॉईड कंपनीने ताबडतोब फोटो छापून देणारा SX-70 कॅमेरा बाजारात आणला.
- १९७४: पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
- १९८२: रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात
- १९८३: अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- १९८६: म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
- १९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
- २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
- २००५: जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
- २०१५: नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२५ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- इ.स. ३२: मार्कस साल्व्हियस ओथो (रोमन सम्राट, मृत्यू: १६ एप्रिल ६९).
- १२१४: लुई नववा (फ्रांसचे राजे, मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०).
- १२२८: कॉन्राड चवथा (जर्मनीचे राजे, मृत्यू: २१ मे १२५४).
- १२८४: एडवर्ड दुसरा (इंग्लंडचे राजे, मृत्यू: २१ सप्टेंबर १३२७).
- १५९९: ऑलिव्हर क्रॉमवेल (ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा, मृत्यू: ३ सप्टेंबर १६५८).
- १८७४: गुग्लियेमो मार्कोनी (इटलीचे संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: २० जुलै १९३७).
- १९१८: शाहू मोडक (हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते, मृत्यू: ११ मे १९९३).
- १९१०: शंकर नारायण बर्वे ('मराठी नियतकालिकांची सूची' हा तीन खंडांचा कोश तयार करणारे 'केसरी-मराठा ग्रंथशाळे'चे संस्थापक ग्रंथपाल, मृत्यू: २३ डिसेंबर १९९६).
- १९४०: अल पचिनो (हॉलिवूडमधील अभिनेते, हयात).
- १९६१: करण राझदान (अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक, हयात).
- १९६१: दिनेश डिसोझा (भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक, हयात).
- १९६४: आर. पी. एन. सिंग (भारतीय राजकारणी, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२५ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ११८५: अंतोकु (जपानी सम्राट, जन्म: २२ डिसेंबर ११७८).
- १२९५: सांचो चौथा (कॅस्टिलचे राजा, जन्म: १२ मे १२५८).
- १३४२: बेनेडिक्ट बारावा (पोप, जन्म: ?? १२८५).
- १६०५: नरेस्वान (सयामचे राजा, जन्म: ?? १५५५/१५५६).
- १६४४: चॉंगझेंग (चीनी सम्राट, जन्म: ६ फेब्रुवारी १६११).
- १७०१: अँडर्स सेल्सियस (तापमानाचे एकक सुचवणारे, जन्म: २७ नोव्हेंबर १७०१).
- १८४०: सिमिओन-डेनिस पोइसॉन (फ्रेंच गणितज्ञ, जन्म: २१ जुन १७८१).
- २००२: इंद्रा देवी (लाटव्हियाच्या योगशिक्षिका, जन्म: २२ मे १८९९).
- २००३: लिन चॅडविक (ब्रिटिश शिल्पकार, जन्म: २४ नोव्हेंबर १९१४).
- २००५: स्वामी रंगनाथानंद (भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन, जन्म: १५ डिसेंबर १९०८).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण
अभिप्राय